Saturday, August 9, 2014

आयुष्य खुप सुंदर आहे : Aayushyaa khup sundar aahe

आयुष्य खुप सुंदर आहे
सोबत कुणी नसल तरीही
एकट्यानेच ते फुलवत रहा ...
वादळात वाहुन गेल
म्हणुन रडत बसु नका
वेगळ अस काही माझ्यात खास नाही ,
म्हणुन उदास होउ नका ...

मृगाकडे कस्तुरी आहे ,
फुलाला गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे ,
माझ्या कडे काय आहे असे म्हणुन रडु नका
अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही आहे

आव्हान करा त्या सूर्याला!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात
एक नवे क्षितीज घेउन
अंधारमय रात्र संपुन , सोनेरी किरणांनी सजुन
मग रोजच वाटेल एक नवी सकाळ
उत्साह धेयाने भरून
म्हणुन .....

आयुष्य खुप सुंदर आहे
सोबत कुणी नसलं तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा....
     
               

Friday, August 8, 2014

कोणीतरी हव ...

कोणीतरी हव असत
कोणीतरी हव असत ..सोबत आयुष्याची वाट चढायला
जो हात देयील कधिही साथ न सोडायाला

कोणीतरी हव असत .. जीवाला जिव देणार ...
स्वत:च्या ह्रुदयात निर्विवाद स्थान देणार ....

कोणीतरी हव असतं दिलखुलास हसणारंं...
काहीही न बोलता बरच समजुन घेणार...

कोणीतरी हव असतं.. सोबत लपंडाव खेळणारं..
पटकन .. सापडली नाही की कावर बावर होणार


कोणीतरी हव असत मनमोकळ  बोलायला ....
अन ..भरून आल की मनसोक्त रडायला

                                  { संकलित }

Saturday, August 2, 2014

मैत्री friendship


मैत्री केली आहेस म्हणुन सांगतो ........


गरज म्हणुन 'नात' जोडु नकोस
सोय म्हणुन सहज अस तोडु नकोस
रक्ताच नाही म्हणुन कवडी मोल ठरवु नकोस
भावनांच मोल जाण.. मोठेपणात हरवु नकोस
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नव नात जुळत असत
जन्मभर पुरेल इतक भरभरुन प्रेम मिळत असत
तुझी ओंजळ पुढे कर, कमिपणा मानु नकोस
व्यवहारातल देणघेण फक्त मध्ये आणु नकोस
मिळेल तितक घेत रहा , जमेल तितक देत रहा
दिल घेतल सरेल तेंव्हा... पुन्हा मागुन घेत रहा .
समाधानात तडजोड असते ...फक्त जरा समजुन घे
'नात' म्हणजे ओझ नाही ,  मनापासुन ऊमजुन घे
विश्वासाचे चार शब्द ...दुसर काही देउ नकोस
जाणिवपुर्वक 'नातं' जप , फक्त मांघार घेउ नकोस

                                                   ~[ संकलित ]


Sunday, July 27, 2014

हरकत नाही

हरकत नाही......

"अक्षर छान आलं य  यात !"
माझी कविता वाचतांना
मान तिरकी करत
ती एव्हढंच म्हणते.......


डोळ्यात तुडुंब भरलेली झोप
कपाळावर पेंगत बसलेले भुरटे केस
निसटुन गेलेली ऐक टुकार जांभाई
आणि नंतर ......
वाचताा वाचता मध्येच
आपसुक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातांतुन
 अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली ,
माझी कवितांची वही ......


हरकत नाही ,हरकत नाही,
कविता म्हणजे तरी आणखी काय असते !
 
                         {संकलित}

Saturday, July 26, 2014

मैत्रीच बंधन

एखाद्यासाठी मरण 
खूप सोप असत …
पण मरण्यासाठी 
एखाद मिळण,
फार आवघड असत … 

एखाद्याची  आठवण काढण 
खूप सोप असत … 
पण आठवण 
आल्यावर अश्रूंना 
संभाळण फार 
अवघड असत … 

एखाद्याशी मैत्री  करण 
फार सोप असत, पण
 ती विश्वासाच्या जोरावर 
टिकवण फार अवघड असत …। 

Friday, July 25, 2014

एकदा एकले काहीसे असे




एकदा एकले काहीसे असे
असीम अनंत त्यात विश्वाचे रण
त्यात हा पुथ्वीचा इवला कण
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्या शहरी छोट्या घरात

घेउनि आडोसा कोणी " मी " वसे
क्षुद्रता आहो हि  अफाट असे !
भिंतींच्या त्रिकोणी जळमळट  जाळी
बांधून राहती कीटक कोळी


तैशीच सारी हि संसार रिती
आणिक तरीही अहंता किती ?
परंतु वाटले खरे का सारे ?
क्षुद्र या देहात जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे !

काचेच्या गोलात बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाश धारा
तशीच माझी या दिव्याची वात
पाहते दुरच्या अपार्तेत !

अथवा नुरले वेगळेपण
अनंत काही जेत्यांचाच कण
डोंगरदऱ्यात  वाऱ्याची  गाणी
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणी

वसंत वैभव उदार वर्षा
लतांचा  फुलोरा
केशरी उषा … प्रेरणा यातूंनी सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र व सान ?

                        -{ कुसुमाग्रज }

Thursday, July 24, 2014

कणा ……….

कणा ……….

"ओळखलत का सर मला " पावसात आला कोणी 
        कपडे होते कर्दमलेले  केसावरती पाणी 
क्षणभर बसला, नंतर हसला , बोलला वरती पाहून ;
        ' गंगामाई ' पाहुनी आली, गेली घरट्यात राहून 
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली 
      मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली 
भिंत खचली , चूल विजली , होते नव्हते नेले,
     प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले 
कारभारणीला घेऊन संगे  सर, आता लढतो आहे 
     पडकी भिंत बांधतो आहे , चिखलगाळ काढतो आहे 
 खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला 
   " पैसा नको सर , जर एकटेपणा  वाटला 
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
 पाठीवरती हात ठेऊन नुसते  लढ म्हणा …."
                                       - { कुसुमाग्रज}




Sunday, July 20, 2014

देवदूत कोणी




वादळला हा जीवनसागर  अवसेची रात
पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात
परंतु अंधारात चकाके बघा बंदरात
स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत 
किरणांचा उघडून पिसारा  देवदूत कोणी
काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी …………….


                                 -(  कुसुमाग्रज )

Wednesday, July 16, 2014

समिधाच सख्या या -

समिधाच सख्या या -

                                            दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता 
                                            वाहते जीच्यातुनी त्याची जीवन सरिता 
                                            खळखळे,अडखळे ,सुके कधी फेसाळे 
                                            परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता !

खडकाळ पंथ तो हि जेथून निघाली 
पथ शोधत आली रानातूनी अकेली 
नच रम्य राउळे कलापूर्ण व घाट 
तीरावरी तुरळक परी अंकुरती वेली 
                                           नवपर्णांच्या या विरळ मांडवाखाली 
                                            होईल साउली कुणा,कुणास कहाली 
                                           तोषेल कुणी शापील कुणी दुर्वास 
                                         " या जळोत  समिधा भव्य हवी वृक्षाली ! "

समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा
कोठून फुलापरी वा मकरंद तो मिळावा ?
जात्याच  रुक्ष या , एकच त्या आकांक्षा 
तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा !
                                               
                                                     -( कुसुमाग्रज )          

Monday, July 7, 2014

आईची आठवण : Aaichi aathvan

आईची आठवण ……. 

आई मला येई ,तुझी रोज आठवण 
डोळे  माझे पानवती ,चिंब भिजतसे मन 

स्नेह आठवे तुझे सारा ,मायेचा मऊ पिसारा 
तू जाता जग सोडुनी ,न उरला कुठे निवारा। .... 

तू गेलीस निघून ,घर वाटे  सुने सुने 
जरी  उरले ना त्राण , मनी  एकांति रडने 

सारे फाटले  आभाळ ,ठिगळे  त्या किती लाऊ 
तुझ्या  आठवांचे पाढे किती काळ  गात राहु 

थरथरती ओठ  माझे , वाचे फूटेना  गे  बोल 
मुक्या  मायेची  पाखर ,काय  करू तिचे मोल 

तुझ्या पावलांच्या खुणा उमटल्या ग अंगणी 
नेत्र माझे पाणावती, येता   तुझ्या आठवणी 

ममतेचे  तुझे बोल , घुमतात   माझे कानी
फिरे पाठीवरती हात , वाटे त्रैलोक्याचा धनी 

तुझ्या स्पर्शाचा गोडवा ,मला जाणवे आजून 
धीर येई माझे मनी , तुझ्या स्मृती चाळवून 

झालो आज मी पोरका , थारा नसे तिन्ही लोका 
येई फिरून माउली , माझी काया  आसुसली 

तू माता  होसी धन्य , जन्मोजन्मी मी स्मरेण 
एक वेळचे स्तनपान ,उपकार न फिटे जाण
                        
                                                          (संकलित )  

Sunday, June 15, 2014

अस्मान कडाडून गेला ..............

अस्मान कडाडून गेला .............. 

मराठी कवी मनमोहन यांनी सावरकरांची अजरामर उडी आपल्या हृदयस्पर्शी काव्यातून दाखवण्याचा केलेला एक प्रयत्न … 

गोदेच्या घाटावरले ,घट्टे पडलेले हात 
मोरिया बोटीवरती ,गुंतले कडी कुलुपात 
हेलकावत सागर होता , बिसकेच्या आखातात । । 

निबिडातून नैराश्याचा ।  मग प्रकाशरेषा दिसली । 
बोटीतील डेकावरती  वाटोळी खिडकी दिसली 
घेतला रोधुनी श्वास , संकुचित केले अंग । 
खिडकीवर धडकत होती उद्धट लाटांची रांग । 
त्या ताठ तुफानाहुनही , छाती याची उत्तुंग । 
देशाचा जयजयकार करुनी 
मारिला सूर वीरांनी 
टाकिले गगन भरोनि 
रवि शशी भंजनाला । अस्मान कडाडून गेला । 

कृष्णाच्या अन्गुलीवरच्या । चक्रापरी तो गरगरला । 
कर्णाच्या पृथ्वीवरल्या । गुंतल्या रथावर चढला । 
शिल्पकार संह्याद्रीचा 
भाष्यकार भवितव्याचा 
परमेश्वर हा प्रतिभेचा 
कल्पात  व्याह्ळून तरला । अस्मान कडाडून गेला 

अशी हि उडी बघतांना । कर्तव्य मृत्यू विसरला । 
बुरुजावर फड फडलेला। झाशीतील घोडा हसला । 
वासुदेव बळवन्तांच्या। कंठात हर्ष गद्गद्ला । 
क्रांतीच्या केतुवरला । अस्मान कडाडून गेला । 

फेसाच्या जाळ्यामध्ये दर्या चघळायासाठी  । 
बंदुकीची गोळी याच्या मस्तकास चाटून जाई । 
देशाच्या सेवेसाठी 
तोडिल्या जीवाच्या गाठी 
लावियले रक्त ललाटी 
ये भगवती राक्षयाला ।  अस्मान कडाडून गेला । 

चपलेच्या चंचल्याने 
पाण्यासी कापी  वेगाने
चुकवीत गोळ्या इर्षेने 
फ्रान्सचा किनारा भिडला । अस्मान कडाडून गेला  । 

या भूमीवरती आहेत विख्यात बहाद्दूर दोन । 
जे गेले आईकरिता । सागरास ओलांडून । 
हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान । अस्मान कडाडून गेला । 
    
      

Saturday, June 14, 2014

अनादी मी अनंत मी : Anadi mi Anant mi

 स्वातंत्र्यवीर सावरकरांचा  कवचमंत्र 

मार्सेलीसला बोटीवरून निसटण्याचा  प्रयत्न केला, त्याचा सूड म्हणून आपला अमानुष छळ  होणार या जाणीवेने अशा छळास पुरून ऊरेल अशा धैर्याचा पुरवठा करण्यासाठी कवचमंत्र म्हणून सावरकरांनी इ.स. १९१० साली समुद्रामार्गात असतांना   रचलेली स्फूर्तीदायी कविता ………


अनादी मी अनंत मी अवध्य मी भला 
मारील रिपु जगती असा, कवन जन्मला 

अट्टहास करीत जगी धर्मधारणी  
मृत्युसीच हात घालू मी घुसे रणी 
अग्नी जाळी मजसी  ना खड्ग छेडितो 
भिउनि मला भ्याड मृत्यू पळत सुटतो 

खुळाऱिपु  तया स्वये
मृत्युच्याची भीतीने भिववू मजसी ये 

लोटी हिंस्त्र सिंहांच्या पंजरी मला 
नम्र दाससम छातील तो पदांगुला 
कल्लोळी ज्वालांच्या फेकशी  जरी
हटुनी भंवती रचिल शीत सुप्रभावली  
आन तुझ्या तोफांना क्रूर सैन्य तें 
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते 
हलाहला त्रिनेत्र तो 
मी तुम्हासी तैसाची गिळूनि जिरवितो 











Friday, June 13, 2014

स्वातंत्र्यवीर सावरकर :Swatyantravir Savarkar by Vedant Talnikar

स्वातंत्र्यवीर सावरकर 


मराठी मनावर सावरकर नावाचे एक गारुडच  आहे . स्वा. सावरकरांचे भक्त असोत अथवा सावरकरांचे विरोधक असोत सावरकरांचे गारुड  हे प्रत्येकावर असतेच . पण गम्मत अशी कि , सावरकर भक्तांना सावरकरांची त्रिखंडात गाजलेली ती उडी माहिती असते आन्दमान मधील सेल्युलर जेलमधील  कोळू , छिलका माहिती असतो,पण सावरकर त्यांच्या पचनी पडलेले नसतात. तर विरोधकांना त्यांचे फक्त हिंदुत्वच दिसते त्या हिंदुत्वामागील महान तत्त्व समजून घेण्याचा त्यांनी कधी  प्रयत्नच केलेला नसतो, याचे अत्यंत समर्पक वर्णन पु.भा. भावे करतात . " एक काळ असा होता ,कि जेंव्हा वि. दा. सावरकर  हि अक्षरे केवळ  स्वप्नातील आभासमय साक्षात्कारासारखी होती .तेंव्हा  वि.दा. सावरकर हि  केवळ गूढ मंत्राक्षरे होती . सावरकर म्हणजे सातासमुद्र पलीकडे झालेला भयानक स्फोट ! सावरकर म्हणजे तुफान दारियात उडी घेणारा ,दैवी दुनियातील वीर ! सावरकर म्हणजे महाभारतातून सजीव झालेले नवरसपूर्ण  पान  ! सावरकर म्हणजे सागर वेष्टित अंदमानातून निघत असलेली भेदक आरोळी ! सावरकर म्हणजे शौर्याचे,त्यागाच, स्वातंत्र्याचे,निराकार केवळ दिव्य असे प्रतीकच ! ". 
                             या प्रतीकाने इहलोकात जन्म घेणे ,भारतमातेच्या उदरी जन्म घेणे आजन्म जन्मालाही नवलाईची गोष्ट !  या  घटनेचे वर्णन करतांना भावे लिहितात, " हिमालयाचे माथे नम्र करील ,इतके उन्नत मस्तक घेऊन सावरकर जन्मले . विद्द्युलतेस निष्प्रभ करील,इतके तेज घेवून सावरकर जन्मले . वादळास स्तंभित  करील इतकी गती घेवून सावरकर जन्मास आले . मेघ गर्जनेस मूक करील, इतका नाद घेऊन सावरकरांचा अवतार झाला . ज्यांचे बाह्य अंग अंतरंगाशी पूर्ण विसंगत आहे व ज्यांची प्रकृती आकृतीशी अत्यंत असंबद्ध आहे ,अशा लक्षावधी प्रतिमा घडविल्या नंतर जणू विध्यात्यास आपल्या कृत्रिम कैतावाचा जणू काही कंटाळा आला व त्याने एक अद्वितीय अशी नवीन प्रतिमा बनवण्यास घेतली .व त्यातून सावरकर जन्मास आले . " सावरकरांचे प्रत्येक अवयव न अवयव या आपल्याला काही न लाही सांगून जातो . त्यांचे नेत्र ! ती  वस्तू अत्यंत अपूर्व व अवर्णनीय अशी आहे . त्यांचे ते नेत्र हे केवळ चार्म्नेत्र नाहीत तर ते तरुण हिंदुराष्ट्राचे ध्येय्दर्शी ध्रुव तारे आहेत . या सनातन भूमीची ती पेटती आंशा ज्योत आहे .धुम्सत असलेली ती स्वातंत्र्याची कल्पना आहे . अकाली विराम पावलेल्या हुतात्म्यांच्या नेत्रातील सारे भाव तेथे उत्कटतेने तेथे एकत्रित झाले आहेत . अल्पकाळ धडकून निघालेल्या ठिणग्यांनी सावरकरांच्या नेत्रात वस्ती केली आहे . विपुल्तेच्या पोटी जन्म लेल्या शतकांच्या अश्रूंचा सावरकरांच्या नेत्रात संचय झाला आहे . आणि म्हणून काळाला ,वार्धक्याला  सावरकरांच्या नेत्रातील तपःसंपादित तेज मालविता आले नाही . सावरकरांचे नेत्र हे नुसते सावरकरांचे नेत्र नाहीत ; तर ते आपले भाग्य शोधावयास निघालेल्या हिंदुराष्ट्राचे नेत्र आहेत . सावरकरांचे कर्तुत्व हे अत्यंत अफाट आणि अत्यंत अविश्वसनीय असेच आहे . 
                                                     आपली मात्रभूमी  सावरकरांचे अवघे भावविश्व व्यापून राहिली होती . त्यामुळे त्यांनी आपले वक्तृत्व वाग्विभवती तिलाच अर्पिलेले होते. " सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेतोवर झुंजेन " अशी सशस्त्र क्रांतीतून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सावरकरांनी अतिशय लहान वयात आपल्या देव्हाऱ्यातील अष्टभुजा देवी समोर प्रतिज्ञा घेतली होती . त्यांनी हे व्रत अंधतेने घेतले नवते ,तर हे सतीचे वान त्यांनी बुध्याची हाती धरले होते. सावरकरांची भूमिका हि वीरांची होती,झुंजाराची होती , ती भूमिका कष्टची होती . कष्टप्रद होती काट्या -कुट्यांनी  व्यापलेली, एक चढणीची वाटच ते आयुष्यभर चढत रहिले. हि चढण  चढतांना ते कधी दमले नाहीत, श्रमले नाहीत, पस्तावले नाहीत कि त्यांचे  पाउल  कधी बिचकले नाही . त्यांनी कधी सुख मागितले नाही .विश्रांती मागितली नाही ,मध्यंतराची याचना केली नाही असा अलौकिक गुण असलेला सेनानी राज्यकर्ता व्हावयास ते फार फार योग्य होते पण तशी भूमिका त्यांना कधी मिळालेलीच नव्हती . गांधीवाधोत्तर अभियोगाचे भयानक पाश ज्याच्या गळ्यावर फेकले गेले होते . केवळ परकीयांकडून नव्हे तर स्वकियांकडून ज्याची आणण्वी   छळना झाली  ,ज्याच्या स्पर्शाने एखाद्या सम्राटाचे सिंहासनही पूत झाले असते,ज्याच्या प्रतिभाशाली नेतृत्वाने राष्ट्राची भाग्ये पालटली असती  परंतु आज जो सर्वस्वी एकाकी ,तरीही सर्वस्वी पूजनीय ,सदा प्रफुल्ल व सदा प्रकाशमान आहे  ,तो हा ! पराभूत ? अपेशी ?      छे ! छे !सावरकर कसले पराभूत ! सावरकर कसले अपेशी ? निष्काम कर्तव्य कधी अपेशी असते काय ? निरपेक्ष विरव्रत कधी पराभूत होते काय ? करंट्या वर्तमानकाळाने  ते ओळखले नव्हते ,पण भाग्यशाली भविष्यकाळ ते निश्चितच ओळखणार आहे . 
                                      स्वातंत्र्यवीर सावरकरांनी " स्वातंत्रलक्ष्मी  की  जय " हि घोषणा देऊन सशस्त्र  क्रांतीचा केतू उभारला . अंदमानातील बंदी वासात  त्यांनी अनेक हालअपेष्टा सोसल्या . नंतर रत्नागिरीतील कैदैत त्यांनी समाजिक कार्यांची मुहूर्तमेढ रोवली .मार्र्सेलेस ,अंदमान ,रत्नागिरी , येथे त्यांनी मृत्यूचे आव्हान अत्यंत सहजतेने परतवून लावले होते . पण १९६० नंतर त्यांची गात्रे आता थकली होती . सावरकरांनी त्यानंतर प्रायोपवेशन सुरु केले . सावरकरांना मृत्यूचे असे भयच नव्हते . मृत्यू जरी सर्वभक्षक असला तरी सावरकर हर मृत्युन्जय होते. दिवसचे दिवस ! आठवडेच्या आठवडे सावरकर अन्नपाणी न घेता ! आणि तरीही मृत्यू थबकत होता ,कचरत होता ,आज त्याला सावरकर मित्रत्वाचे आमंत्रण देत होते पुनः पुनः त्याचा हात ओढीत होते त्याला आपल्या कुशीत घेण्याचा प्रयत्न करीत होते . जनु काही मृत्युलाच आहे वाटत होते ., या विरात्म्याला आपण स्पर्श तरी तो कसा करवा ? या सुचीर्भूत तत्वज्ञानाच्या  जवळतरी  आपण कसे जावे ? या  काव्यात्म्याला आपण निशब्द कसे करावे ? पंडिताच्या या महासागराला शुष्क करणार आपण कोण ?  चैतन्याच्या या दिव्यावर आपण कशी फुंकर घालावी ? चलबिचल होती ती मृत्युच्या मनात सावरकर मात्र शांत होते. विद्यार्थीदशेत एका ध्येयासाठी मरणावर स्वारी करण्याचा  उपदेश करणारा हा प्रेषित , प्रसंग आला तेंव्हा मृत्यूवरही चालून गेला .,त्याच शांत तत्वाने आणि धेर्याने . 
सावरकरांच्या जाण्याने मात्र सर्वत्र अंधेर झाला . हिंदुस्थानचा व हिंदुत्वाचा एक  अनमोल ठेवा हरपला .सावरकरांचे असणे हे केवेळ नुसते ' असणे ' नव्हतेच,सूर्याचे असणे ज्या प्रमाणे भव्यतेची कल्पना जागृत ठेवते ,सागराचे अस्तित्व ज्याप्रमाणे आपल्या सर्वसमावेशाची ,अथांगतेची चुणूक दाखविते , अगदी  तसेच होते सावरकर एक अनंत काळ टिकणारे एक तेजोमयी,प्रेरणादायी नेतृत्व …!
        





























जग हे सुंदर आहे ………

जग हे सुंदर आहे ……… 


जग हे सुंदर आहे 
सोंदर्य डोळ्यात हवे 
अशीच दृष्टी लाभावी 
म्हणजे धरती डोळ्यात मावे 
                             
                                                 डोळे मनाचा आरसा 
                                                मन असे हवे,जसे 
                                                 सरळ पारदर्शक 
                                                पाण्यावरचे कवडसे 

मन नितळ नितळ 
पाण्यासारखे पातळ 
दगडासम कठीण 
जणू कातळ कातळ 
                           
                                                मन प्रेमळ प्रेमळ 
                                                कलंदर कालाप्रेमी 
                                                आनंदित चित्तवृत्ती 
                                                जगण्याची नवी उर्मी 
    

                                                                      (संकलित )              
                                      

वाटचाल ……

वाटचाल …… 

आयुष्याच्या वाटचालीत 
प्रत्येक वळणावर 
कुणी न कुणी 
भेटत राहिला 
कधी देवदूत म्हणून 
तर कधी यमदूत म्हणून 
देवदूत विस्मरणात  गेला 
यमदूत मात्र चिरकाल लक्षात राहिला 
फुलान्बरोबारच्या काट्यासारखा 
सलत राहिला 
फूल सुकून गेले 
तरी बोचतच राहिला 
मानवाचे जगणेही असेच आहे 
सुख विसरायचे 
अन दुःख उगाळायचे 
अश्वत्थाम्याच्या फोडागत 
आयुष्यभर जपायचे ……. 

                       (संकलित )

झाड पोखरले आहे …

झाड पोखरले आहे …

खूप तहान लागली आहे मला 
पण कुठे दिसत नाही गोड पाण्याचा झरा 
मोकळा श्वास घ्यायचं मला 
पण नाही दिसत वाहता झुळझुळता  वारा
लख्ख प्रकाशाची भेट घ्यायची आहे मला 
पण भक्तीचे दिवे तर निस्तेज होत आहेत 
माणसांच्या घरी जाऊन बोलायचं मला 
पण मनाचे ओठ तर बंद बंद आहेत 
काल  तरी कसे सगळे निरभ्रः ,सतेज होते !
आज कसे कोमेजलेले …. रसहीन झाले?
खरे सांगू ? मोहाने झाड पोखरले  आहे 
पाने फुले सावली नाही असे झाले आहे 
                                     
                                  - दत्ता हलसगीकर  

Thursday, June 5, 2014

सिक्कीम प्रवास वर्णन experience of sikkim...

  सिक्कीम प्रवास वर्णन

   "  हिमालयाची महती कुणाला ग वर्णवेल ,
       पातळाचा हि थकेल  सहस्त्रफणी "


खरच या ईश्वराने आपल्याला जे  अद्भुत,  किमयागार अविष्कार दाखवले आहेत त्या पैकी सर्वात अग्रगन्य आहे तो ' हिमालय '.  प्रत्येकालाच कशाची न कशाची आवड हि असतेच, तशी मला देखील डोंगरदऱ्यात फिरण्याची येथील मजा अनुभवण्याची फारच आवड आहे.  चातकाला जशी वरुणाची ओढ असते, नदीला जशी समुद्राला भेटण्याची ओढ असते तशी मला देखील हिमालयाच्या संगतीची फारच आवड आहे.  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मग आम्ही मुहूर्त शोधला आणि आम्ही जवळपास पंधरा जण निघालो एका नवीन सफरीवर, ते हिमालयाचा मेरुमणी असणारा प्रदेश म्हणजेच सिक्कीम चा प्रदेश.  पर्यटनाची आवड मनाला स्वस्थ बसू देत नाही हे तितकेच खरे आहे म्हणूनच प्रवास हि गोष्ट अशी आहे जी माणसाला विविध  गुणांनी समृद्ध करते आणि जीवनाची मजा  सुद्धा  अनुभवायास देते. 
                       भारताच्या ईश्यान्येकडे स्थित असलेले सिक्कीम हे खरे तर अत्यंत छोटेसे राज्य परंतु त्याच्यातील अगाध,निस्सीम सौंदर्यामुळे ते भारतीय भूमीतील सौंदर्याचा मुकुट  मनीच  शोभून दिसते . अशा सिक्कीमला जाण्यासाठी माझे मन खरोखरच खूप आतुर झाले होतेआणि दिवस ठरला २५ मे २०१२,  या दिवशी आम्ही सर्व जन नांदेड हून धनबाद गाडीने निघालो सुरुवातीला आम्ही वाराणसी येथे गेलो , वाराणसी हे सर्व धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असे स्थळ आहे य़ स्थळाची महतीअगदी अनादिकालापासून आहे.  य़ेथिल गंगामाता येथील पावित्र्याचे जागृक  प्रतीकच आहे .  या क्षेत्री गंगा नदीवर सुमारे ३६५ घाट  बांधले आहेत .राजा हरीश्चन्द्रापासून पेशवाई पर्यंतचे अनेक घाट येथे आहेत. आम्ही सकाळीच वाराणसी येथे पोहोंचलो असल्यामुळे आम्ही तेथिल विविध घाट तसेच मंदिरे पहिली .तेथिल अत्यंत पवित्र अशा काशी विश्वेश्वराचे दर्शन हि घेतले .रात्री साडेदहा वाजता आम्ही तेथून राजधानी एक्स्प्रेस मध्ये बसलो  सिक्कीम हे राज्य पश्चिम बंगालच्या उत्तरेला आहे व या राज्याला सुमारे तीन देशांच्या सीमा स्पर्श करतात त्या म्हणजे चीन, नेपाल, आणि भूतान . दुसर्या दिवशी  साडे बारा वाजता आम्ह न्यू जलपायगुरी येथे पोहोंचलो . हे गाव गुवाहाटी कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आहे . येथूनच दार्जिलिंगला जाण्यासाठी टॉय ट्रेन आहे .दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल मधील हिल स्टेशन आहे आहे . आम्ही नांदेड मधूनच सनफ्लॉवर  ट्रॅव्हल्स कडून आधीच बुकिंग केलेले असल्यामुळे आम्हाला न्यू जलपायगुरी स्टेशनवर गाडी आलेली होती .  येथून खरा आमचा डोंगर दऱ्यांच्या व नदीच्या सोबत प्रवास सुरु होत होता . नदीचा येणारा तो झुळझुळ  आवाज मनाला हर्शोह्लासित करत होता. निसर्गाच्या स्पर्शाने  आम्हा सर्वांचे मन उधान वाऱ्यागत होऊन आनंदाने डोलू लागले आशा भारावल्या मनःस्थितीत आमचा प्रवास सुरू होता . आमच्या सोबत अखंडपणे आमचा हात धरून निसर्ग दाखवणारी तिस्ता नदी खळखळाटाने वाहत होती मजल दर मजल करत आम्ही सिक्कीमची राजधानी गंगटोक इथे प्रवास करत होतो .
                               हिरवा निसर्ग हा   भवतीने
                                जीवन सफर करा मस्तीने
या ओळीचा आस्वाद घेत होतो . सिक्कीमचा हा प्रदेश म्हणजे हिमालयाचा अति पूर्वेकडील भाग आहे आशा या हिमालयाच्या सानिध्यात    प्रवास करत आम्ही सायंकाळी ५. ३० वाजता गंगतोक इथे पोहोण्च्लो . तेथील थंडावा शरीराला हुडहुडी भरवत होता . तिथे आमच्या लॉजवर स्नान करून गंगटोक  येथील प्रसिद्ध मार्केट एम . जी रोड  येथे फिरावयास आलो . एम जी रोडवरील ती स्वच्छता ,शिस्त, डेकोरेशन पाहून डोळ्यांचे पारणे फिटले दिवसभर प्रवासाच्या थकव्यामुळे आम्ही कधी निद्राधीन झालो ते कळलेच नाही



त्या दिवशी आम्ही जर लवकरच झोपलो .  कारण दुसर्या दिवशी पहाटेच आम्ही निघणार होतो ते सिक्कीम स्पेशल ,बर्फाचाडीत लाचुंगला . लाचुंगच्या भागाची उंची सुमारे १२००० फुट आहे . इतक्या प्रचंड उंचीवर असूनही हे गाव अत्यंत सुंदर आहे . गंगटोक पासून लाचुंगचे अंतर हे सुमारे १२० किमी आहे . सकाळी आम्ही आमच्या हॉटेलवरच नष्ट केला व त्यानंतर  निघालो .लचुङ्ग्ल जातानाचा रस्ता अत्यंत कठीण असल्यामुळे तेथे फक्त फोर्से च्या जीपच जाऊ शकत होत्या , आमच्या मॅनेजरने तेथे अगोदरच जीपची व्यवस्था करून ठेवली होति. लाचुन्ग्ला जाणारा रस्ता म्हणजे अक्षरशः उभी चढण .व  सततचा पाऊस यामुळे रस्त्यावरूनही बरेच ठिकाणी पाण्याचे प्रवाह जात होते . परंतु आम्ही निघाल्या नंतर काही वेळातच वातावरण स्वच्छ झाले. व त्या सुंदर अशा निसर्ग देवतेच्या निरागस रूपाचे दर्शन आम्हाला झाले . येथून पुढे जाताना आम्ही सुरुवातीला "सेव्हन सिस्टर फॉल्स " या धबधब्या जवळ गेलो य़ फॉल्स च्या नवा प्रमाणेच हा धबधबा अत्यंत उंच अशा डोंगरावरून येतो व तो जवळपास सात वेळा एका कड्या वरून दुसर्या कड्यावर पडतो . हे दृश्य अत्यंत विहंगम असे दिसते .याचा तो सात वेळा पडणारा प्रवाह अत्यंत मन मोहक दिसतो . तेथे  जवळ जाऊन आपल्याला त्या धबधब्याचे दर्शन घेत येते .त्यानंतर आम्ही
नागा धबधबा पहिला . निसर्गाचे ते अचाट वैभव पाहून मला
        " गिरीचे मस्तकी गंगा ,तेथुनि चालली बळे       
         धबाबा लोटल्या धारा ,धबाबा तोय आदळे
         गर्जतो मेघ तो सिंधू,ध्वनी कल्लोळ उठिला
         कड्यासी आदळे धारा ,वात आवर्त होत असे "
                           या रामदास स्वामींच्या उक्तीची आठवण आल्या वाचून राहिली नाही . हा प्रदेश म्हणजे सुचीपर्णी वृक्षांची दाट आराण्ये
,गगनचुंबी शिखरे , असंख्य फुले ,खळ खळ नाऱ्या नद्या ,नाना रंग रूपाचे पक्षी असे हिमालयाचे गोंडस रूप आहे . येथल्या प्रवासात आम्ही जसे जसे पुढे जाऊ लागलो तशी तशी निसर्गाची नवनवीन रूपे आमच्या दृष्टीस पद्लि. उंच उंच हिमधवल शिखरांच्या कुशीतून वळणा वळणाने आमची गाडी पुढे सरकत होती .बाल्ति,लडाखी,दार्द ,नेपाली,भोतीया,लेपचा,आणि अशाच कितीतरी मंडळींचे हिमालय हे
पिढ्यानपिढ्यांचे  निवास्थान .धर्म -संस्कृती ,भाषा -पेहराव,आहार-विहार, हि मंडळी आपल्या पेक्षा खूपच वेगळी परंतु या लोकांची प्रामाणिकता खरोखरच वाखाणण्या जोगी होती .येथील driver पासून सर्व लोकांनी  आम्हाला सढळ   हातांनी मदत केली . हि माणसे तेथील निसर्ग प्रमाणेच पहाडी हृदयाची होती . बर्फाच्छादित  गिरिशिखरे ,उंच उंच खिंडी,  जलप्रवाह , यांच्या साथीने निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही सर्व लाचुंग ला सायंकाळी साडे सात वाजता पोहोंचलो पहाडी भागात सतत होणारा पाउस ,रस्त्यावर असलेली चिकन माती , यामुळे सरासरी एक तासात केवळ १२ ते १५ किमी अंतर पार होते . त्यामुळेच आम्हाला या लाचुंग ला पोहोन्च्ण्यासाठी सायंकाळ उजाडली . लाचुंग हे सिक्कीमच्या उत्तरे कडे वसलेले एक लहानसे टुमदार गाव असून त्याची उंची सुमारे ९,६०० फुट एवढी आहे . या गावातून लाचेन हि तिस्ता नदीची उपनदी वाहते .लाचुंग हे गाव अत्यंत सुंदर व प्रेक्षणीय तेथील valley बघण्यासाठी बाहेरच्या देशातून सुद्धा पर्यटक येतात . परंतु आम्ही ज्या वेळेस तिथे पोहोंचलो त्या वेळेस बराचसा अंधार पडला होता . रात्रीच्या त्या काळोखात निसर्गाचे ते रूप अत्यंत गूढ वाटत होते . तेथील काळोख ,शांतता तेथील परिसराची जाणीव करून देत होती . त्या छोट्याश्या  गावात आम्ही एका लोज वर उतरलो ती रात्र आम्हाला तेथे काढायची होती . ते हॉटेल  डोंगराच्या एका कड्यावर वसलेले होते त्याची बांधणी लाकडाचीच होती .त्य हॉटेलच्या खालून पाण्याचा एक प्रवाह {ओढा } जात होता . रात्रीची ती निरव शांतता भेदणारा नद्यांचा खळखळाट  ,नभातील मेघांचा गडगडाट , मधूनच चमकणारी वीज व अचानक सुरु होणारा पाउस असे ते निसर्गाचे अनोखे ,गूढ रूप आम्ही सर्व त्या दिवशी पाहात होतो."निबिड दाटली छाया त्यामध्ये ओघ वाहती " असे काहीसे ते रूप होते.
                                                           अंगात तीन तीन टी  शर्ट  घालून सुद्धा तेथे ऊब  मिळत नवती एवढी भीषण थंडी थेथे होती आणि तीही जून मध्ये . पहाडी भागात सूर्यास्त  व सूर्योदय बराच लवकर होतो तिथे साधारणतः सकाळी पाच वाजताच उजाडलेले असते . त्या मुळे  दुसऱ्या  दिवशी लवकरच आम्ही ५:३० वाजता "  "युम्थांग valley " व  " zero point " बघन्या   करता निघालो . रात्रीच्या त्या भिषणतेनंतर जेंव्हा आम्ही सकाळी उठलो व आजू बाजूला पहिले तेंव्हा खरच सांगू मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता  . चारी बाजूंनी सुंदर हिमाच्छादित शिखरे व त्या मध्ये बसलेले हे टुमदार गाव असे अविश्वसनीय आसे ते मनोहर दृश्य होते . हिमालयाच्या त्या भव्यातेकडे पाहून त्याच्या पुढे अलगदच माझे माथे  नमले व त्या नागधीराजास मी मनोमन अभिवादन केले . त्या दिवशी आम्ही जात होतो त्या नागधीराजाच्या कुशीत खेळण्यासाठी  व त्याच्या मखमली धवल बर्फात नाहून जाण्यासाठी . आम्ही युम्थांग valley साठी प्रयाण केले. लाचुंग पासून पुढचा रस्ता म्हणजे driverची कसोटी पाहणारा होता . इथे आम्हला हिमालयाचे रौद्र रूप दिसून येत होते . क्षणोक्षणी मृत्यू जणू जबडा आ वासून बसलेला होता . किंचीतशी चूकही येथे माफक नव्हती . रस्त्याच्या एका बाजूला दरी ,रस्ता कसला तो केवेळ  मातीचा रस्ता  आणि पाउसमुले तो उला झाला होता त्यावरुन  जातांना  गाडीचे तयार घसरत होते . परंतु अशातही ती  "हिमशिखरे" आम्हाला साद घालत होती .



             .  ती शिखरे आम्हाला धैर्यही देत होति. त्या वेळी कळले हिमालायचे आव्हान पेलणे काही सोपे नाही  . जिथे सार्या डोंगररांगांची उंची संपते तेथून हिमालय सुरु होतो . आठ हजार मीटर  हून अधिक उंच असलेली तब्बल चौदा शिखरे केवेल या हिमालयातच आहेत . अशा या एकमेवाद्वितीय हिमालयाची सुंदरता ,भीषणता  पाहत आम्ही पुढे सरकत होतो . युम्थांग  valley ला मागे टाकून आम्ही आधी "zero point" ला जाण्याचे ठरवले कारण तेथील वातावरणाशी आपल्याला कधी मेल घालता येत नाही .एक्द का वातावरण भिघ्डले कि आपले काहीच पाहणे होणार नाही म्हणून आम्ही पुढे निघालो . नुकतेच उन पडले होते व त्या उन्हात झळाळणारा  बर्फ मला पहायचा होता . म्हणून माझे मन खूपच आतुर झाले होते . हा  "zero point " लाचुंग पासून सुमारे ५० किमी दूर आहे परंतु तिथे पोहोन्चायला आम्हाला जवळ अडीच तास लागला .  अंगात दोन स्वेटर घालून सुद्धा आम्ही काकडत होतो .तिथे जाण्यासाठीसुद्धा वेगळा पोशाख मिळतो तो सुद्धा आम्ही घातला होता ।तिथे जाताना ल दिसणारे सौंदर्य मन हर्षून जात होते .






तिथे जेंव्हा आम्ही पोहोंचलो तेंव्हा हाडे घोठवणाऱ्या  थंडीने अनेकांना चक्करा  आल्या . तेथील वातावरणाशी जुळवून घ्यायला बऱ्याच  जणांना वेळ लागला कारण तिथे oxygen  ची कमतरता असते. पण आम्ही मुल मात्र अत्यंत आनंदात व उत्साहात होतो ।तशि बर्फावर चालण्याची माझी हि दुसरी वेळ होती कारण या आधी आम्ही मनाली ला असच रोहतांगपास येथे बर्फावर खेळलो होतो . परंतु तिथे उंची कमी होती येथे उंची खूपच जास्त होती . हे ठिकाण समुद्र सपाटी पासून सुमारे १६,००० फुट उंचीवर होते . त्या वेळी विचार आला एव्हरेस्टची उंची तर याहीपेक्षा तिप्पट आहे  , इथेच आपले असे होत आहे तर तिथे जाणार्या गिर्यारोहकांची तर कशी परीस्थिती असेल . तो परिसर एखाद्या हिमनगरी  प्रमाणेच शोभून दिसत होता . त्या सौंदर्याने आम्ही इतके रममाण झालो होतो कि एकमेकांच्या अंगावर बर्फ फेकणे ,बर्फावरून खाली घसरत येणे ,यात आमचे पूर्ण कपडे ऒले  झाले होते . आता लिहितांनाही तीच जाणीव ,तीच अवस्था , मजा  आनुभवायास येत आहे . .टी व्हि च्या पडद्यावरून बर्फ बघणाऱ्या व्यक्तींना याची कल्पनाच करता येणार नाही असे क्षण आपल्या आयुष्यात  फारच कमी वेळा येतात परंतु आयुष्याच्या असंख्य क्षणांपैकी हे मोजकेच अजरामर असतात . त्यांचा खोल ठसा आपल्या मनावर उमटतो .
                                                           अशा त्या हिमनगरीतून परतावयास मन तयारच होत नव्हते पण जास्त मोह सुद्धा घातकच असतो . त्यामुळे आम्ही परत फिरलो तिथला तो अद्भुत निसर्ग पाहून मला वाटले
                            ढगात हरवली
                            वळणांची ती वाट
                            उरात  शिरशिरी
                            हा हिमालयाचा घाट  …….
                                            हवेतील तो  गारवा  , ती गुलाबी थंडी ,तो किमयागार निसर्ग असे ते रूप डोळ्यात साठवून आम्ही परत फिरलो . परततांना आम्ही युम्थांग valley  येथे आलो .उंच  पर्वत माथा,त्यामध्ये पठारी प्रदेश ,पक्ष्यांचा किलबिलाट , नद्यांचा खळखळाट,शिखरांच्या डोक्यावर हिम ,व तो थंडावा असे काहीसे त्या युम्थांग  valley  चे द्र्य्श्य होते. त्या valley चे सौंदर्य अत्यंत अद्भुत होते स्वर्गालाही लाजवेल आस तिथला थाट  होता. या valley  त आम्हाला याक नावाचा प्राणी पहावयास मिळाला . हा प्राणी म्हणजे या प्रदेशाची शानच आहे ,काळ्या  रंगाची पाठ त्यावर  केसांचा प्रचंड झुबका व शिरावर फक्त शुभ्र हिमाप्रमाणे पांढरे कुरुळे
  केस असा तो बलदंड शरीरधारी होता . त्या गीरीशिखारांचे ते अद्भुत सौंदर्य पहिल्या नंतर आता आम्हला ऒढ लागली ती खाली सुरक्षित खाली पोहोन्च्ण्याची .परन्तु निसर्गाच्या अद्वितीय रुपात आमचा प्रवास कसा सरला व कधी आम्ही लाचुंग ला पोहोंचलो ते कळलेच नाही . आता आम्हाला गंगटोक  ला परत निघायचे होते . त्या भागात आपल्या सारखी पोळी भाजी मिळत नाही .तेथे आम्ही मग दाल भात खाउनआम्ही परतीच्या प्रवासास लागलो . परतीच्या प्रवासात आम्ही जर लवकरच  गंग्तोकला पोहोचलो . त्या दिवशी दिवसभर प्रवास झाल्यामुळे आम्ही भरपूर थकलो होतो ऱत्रि ९:३० वाजता आम्ही जेवण केले .व त्यानंतर आम्ही आमच्या रूम वर आलो . त्याच्या दुसर्या दिवशी आम्ही जाणार होतो ते " नथुला पास" येथे .परन्तु आमच्या टूर  मेनेजरने आम्हाला सांगितले कि त्या भागात   लॅन्ड स्लाईडींन्ग झाल्यामुळे तेथे अनेक गाड्या आडकून पडल्या आहेत तर आपण उद्या दक्षिण सिक्कीम बघण्यासाठी जाऊया . आमच्या कडे एक दिवस रिकामा असल्याने आम्ही त्या भागात जाण्याचे ठरवले  व दुसऱ्या  दिवशी आम्ही निघालो . दक्षिण सीक्किम चा भाग म्हणजे खरे तर कमी उंचीचा प्रदेश .परन्तु या भागाचे सौंदर्य आहे ते येथील चहाचे माले व त्यांनी झाकलेली विस्तीर्ण आशी डोंगररांगा . सुरुवातीला आम्ही ती गार्डन  बघण्यासाठी निघालो . हे ठिकाण गंगटोक  पासून सुमारे ८० किमी आहे य़ भागात आम्हाला हिमधवल शिखरे दिसणार नव्हती परंतु हिरवा निसर्ग आमच्या सोबतीला होता . पर्वतांनी जणूकाही हिरव्यागार रंगाची दुलईच  पांघरली आहे असे ते अल्ल्हाददाई  दृश्य होते . या भागात सुचीपर्णी वृक्षांची भरपूर जंगले आहेत . विविध पक्षी या भागात आपल्या सुमधुर कुन्जनाने हा परिसर नादमय करून सोडतात .
                                          सिक्कीमचा  राज्य प्राणी   असलेला  " लाल पांडा " येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो . येथील चहा आगदी जगभरात प्रसिद्ध आहे .तेथिल एका ठिकाणी आम्ही तेथील चहा विकत सुद्धा घेतला .ते चहाचे मळे  पाहून आम्ही एका बुद्ध मंदिराकडे गेलो . हे मंदिर गौतम बुद्धांचे शिष्य स्वामी पद्म्संभावा यांचे आहे .तेथे बुद्ध धर्मियांचे गुरु दलाई लामा अनेक वेळा वास्तव्यास येत असतात. मंदिराच्या वर स्वामी पद्म्संभावा यांची उंचच्या उंच मूर्ती आहे . हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे आठ हजार फुट उंचीवर आहे . या मंदिरात एक ध्यानगृह सुद्धा आहे . एव्हढे प्रशस्त मंदिर पाहून खरच डोळ्यांचे पारणे फिटते याच ठिकाणाहून पुढच्या डोंगरावरची उंच शंकरांची मूर्ती दिसते . हे बुद्ध मंदिर पाहून झाल्यावर आम्हाला त्या मुर्तीपाशीच जायचे होते . हि  मूर्ती स्थित असलेले ठिकाण म्हणजे " श्री सिद्धेश्वर धाम " होय . त्या ठिकाणी जाण्या साठी आम्ही मंदिर उतरून पुढचा प्रवास सुरु केला . सभोवतालचा शांत थंड निसर्ग फारच हृदयस्पर्शी वाटत होता . विविध पक्षी , फुलपाखरे, फुले पाहून मन प्रसन्न होत होते .
                                              मधून दिसे मृदू
                                              पुष्पांचा ताटवा
                                              रंगीत सानुल्या
                                              फुलपाखरांचा थवा ……
असे काहीसे इथले सौंदर्य होते . काही वेळातच आम्ही सिद्धेश्वर धाम येथे पोहोचलो. हे ठिकाण २००५ साली सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी बांधले . ह्या ठिकाणी चार धाम,व बारा ज्योतिर्लिंग यांच्या मंदिरांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत . इथ श्री साई मंदिर व शंकरांची सुद्धा १०८ फुटांची भव्य मूर्ती आहे . ती मूर्ती तेथील भव्यतेची साद देते . हे सिद्धेश्वर धाम पाहून आम्ही परत गंगटोक  च्या  मार्गाला लागलो . परतीचा प्रवास करतांना आम्ही आमच्या driver  च्या घरी गेलो त्याच्या घरी आम्हाला सिक्कीमचा विशिष्ट पदार्थ " मोमो" याची चव चाखता आली . एव्हाना संध्याकाळ झाली होती व थंडीचा ऒघ वाढत होता . अशा  त्या थंडीत ते मोमो व त्याबरोबर गरम गरम सूप पिण्याची मज काही ओउरच होती. हे मोमोज खाऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासासाठी लागलो निसर्गाच्या  सानिध्यात आम्ही पूर्णपणे देहभान हरपलेले  होतो  ना आम्हाला घराची आठवण येत   होती न आम्हाला घरी जायची ऒढ लागली होती . मजल दरमजल करत आम्ही गंगटोक  येथे पोहोंचलो.
त्य दिवशी रात्री आम्ही एम . जि. रोडवर  बऱ्यापैकी खरेदी केली व त्यानंतर हॉटेलवर गेलो . सिक्कीमला अनेक देशांची सीमा लाभली आहे . त्यात चीन हा बलाढ्य देश त्याच्या उत्तर सीमेकडे आहे . १९६२ सालचे चीन सोबतचे  युद्ध ते याच भागातले. सिक्कीमच्या "नाथूलापास "या ठिकाणी भारत आणि चीन यांची सीमा आहे .तर दुसर्या दिवशी आम्ही निघणार होतो ते नथुला पासला य़ नथुलापासला जाण्यासाठी आधी तेथील आर्मिकडून परमिट काढावी लागते . आमच्या टूर मॅनेजरने आम्ही तिथे येण्याच्या आधीच तेथील परमिट  काढून ठेवली होती त्यामुळे आम्हाला तेथे जाणे सोयीस्कर झाले . त्या दिवशी आम्ही लवकर निघालो नाथुलाचा हा प्रदेश सुद्धा १५००० फुट उंच आहे . इतक्या उंच ठीकानी अशा कठीण  वातावरणात आपले जवान कसे काय तेथील परिस्थीतीचा सामना करतात  हे कुतूहल पूर्ण करण्यासाठी मला तेथे जाण्याची ऒढ लागली होती . गंगटोकपासून हि सीमा फक्त ६० किमी एवढ्या अंतरावर आहे .तेथे जातानाचा रस्ता हा अत्यंत दुर्गम असून तो अक्षरशः खड्या  चढणीचा आहे .
                                                          सतत होणाऱ्या   लॅन्ड स्लाईडींन्गमुळे  इथील रस्ता सदैव खराबच असतो . तो भाग पूर्णपणे आर्मी साठी राखून ठेवला आहे य़ भागात लोकांच्या वस्त्या फारच कमी प्रमाणात दिसून येतात ज़गोजागी  आर्मीचे विशाल कॅम्प दिसतात. येथील जवानांच्या  ड्यूटी ६ महिन्यांच्या असतात . इथे येणारे जवान भारतातील विविध प्रदेशातून येत असल्यामुळे त्यांना येथील वातावरण लागू व्हावे यासाठी ह्या   कॅम्पमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात येते . अनेक जवान तेथे पर्यटकांच्या गाड्यांना त्रास होउने यासाठीही जागरूक असतात . तेथे जाताना लागणाऱ्या निसर्गाची किमया ,व भारतीय जवानांची देशभक्ती पाहत आम्ही पुढे जात होतो . जवळजवळ आदीच तासांनी आम्ही नथुला पासच्या बॉर्डरच्या मेन गेटपाशी पोहोंचलो.




















Sunday, June 1, 2014

विनायका प्राण तळमळला :Vinayaka Pran

विनायका प्राण तळमळला ………. 

           "सागरा प्राण तळमळला " म्हणत सावरकरांनी सागराला विनवणी केलीआता सावरकरांनाच एका कवीने केलेली विनवणी ……… 

       
ये समय तुझ्या अवतरणाचा  आला ,नरवरा प्राण तळमळला 
बघ त्रस्त किती झाली भारतमाता,  येईना जयश्री हाता !
फड्कून  नभी मुक्तीध्व्जा जरी आहे , कां नेत्रातूनी जल वाहे ?
नच राष्ट्ररती कुठे रतिभर दिसते , का ब्र्हम्लेखनी रुसते ?
स्वार्तांध  इथे सर्व धावती होती , ठावे नच  कोठे जाती?
             जणू ग्रहण लागले सूर्या रे !
             कि दुःस्थिती  नच परीहर्या रे ?
             तू येई पुन्हा नरवर्या  रे  !
जरी भाव तुला शब्दांवाचून कळला !!१!! नरवरा । 

धृतराष्ट्र इथे सर्व भासती साचे , कोणा न भान कोणाचे 
पांचाली हि भारत माता  भासे, अबलत्वं  तिला ते ग्रासे 
 हतशक्ती इथे भीष्म द्रोण जणू सर्व , वाढे दुःशासन गर्व 
कौरव कसे स्वजनही  इथे गमती, पांडवही द्युति रमती 
           तू कृष्ण होऊनी येई रे !
           तू एक आम्हा वर दायी  रे !
          बघ धीर खचोनी जाई रे !
येशील अशी आस लागली सकला !!२!!नरवरा …। 

मृग वर्मी जणू व्याध घाव हा बसला, कर्दमी जणू गज फसला 
वद आज तसे दुःखे व्याकुळलेले , कां हिंदुराष्ट्र हे झाले ?
आतंकाचा सर्प तसा फुत्कारी , विष त्याचे तर भय कारी 
भूमातेसी विळखा आजी तो घाली , प्रतीकार शक्तीही गेली 
         चेतना लोपली सारी रे !
         विष सुधारलतेसी मारी रे !
         तू होई शंभू कामारी रे !
तुजवीण कुणी पचवावे या गरला ?  !!३!! नरवरा …।   

  

ते दिवस........

                 


              ते दिवस खरच खूप छान होते 
              अवखळ ,खेळकर आणि वयानेही लहान होते 
             कसे निघून गेले कधी कळलंच नाही 
             मनासारखं प्रत्येकाला अजून छळलच नाही 

             खरी मजा तेंव्हाच केली विसरता न येणारी 
             भांडण करूनही सर्वाना अलगद समजून घेणारी
             भांडण करायला तेंव्हा विषय कोठे होता ?
             आणि भांडणाला विषय लागतो 
             असा नियम तरी कोठे होता ?
            
             क्रिकेट आणि बेसबॉलची आवड जर जास्तच होती 
            खर सांगू तेंव्हा आपली टीमच आशी मस्त होती 
             दिवसभर धुडगूस नुसता तहान भूक विसरून जायचो 
             जर भूक लागली कि गच्चीत जाऊन पापड्या खायचो !

           एकमेकांच्या चहाड्या करत दुपार टळून जायची 
           संध्याकाळी परत आपली मैत्री फुलून यायची 
           पटकन व्हायचो एकत्र आणि सुरु व्हायचा खेळ
           आणि क्षणभरात  निघून जायचा संध्याकाळचा वेळ !

          जेवणासाठी  आयांच्या  हाका सुरु झालेल्या 
          त्याचवेळी आपला खेळ ऐन रंगत आलेला 
          थांब थांब म्हणता म्हणता खूप वेळ जायचा 
         अन थोड्यावेळाने सगळ्यांच्या आय लाटणे घेऊन यायच्या 

        सुट्टीच्या दिवशी सगळे फिरायला जायचो 
        सगळे प्रोग्राम कॅन्सल करून मुद्दाम भेटायला यायचो 
        भेल ,दाबेली ,पाणिपुरी मनसोक्त खायचो 
       अन भर उन्हाळ्यात मग स्वेटर घालून फिरायचो 

       आता मात्र भेटायसाठी वेळ शोधावा लागतोय 
      भेटायलाही आता कॅलेंडरचा मुहूर्त शोधावा लागतो 
      न भेटण्याची कारण सुद्धा तयार ठेवलीत सगळ्यांनी 
     आठवणींचे थवे सोडलेत मनात आल्या गेल्यांनी 

       कोण कुठे निघून गेल आता काही पत्ताही लागत नाही  
         भेटू म्हणल तरी कोणी भेटत नाही
      संपले ते दिवस ,आता आठवणी फक्त ताज्या आहेत 
           तुमच्या आहेत का माहीत नाही
     पण आजून तरी त्या माझ्या  आहेत!      
       

Wednesday, May 28, 2014

नैनितालचा अनुभव

मी केलेला प्रवास …………. 

आजच्या धाकाधुकीच्या  आयुश्या मध्ये  प्रवास हा शब्द मनाला प्रफुल्लित करणारा आहे. प्रवासाने मनाला विरंगुळा ,समाधान,सुखशांती, असे सर्व काही मिळते त्यामुळे आपण ताजेतवाने होऊन येणाऱ्या कार्याला पुरून  उरतो .प्रत्येकाने एकदातरी प्रवास अथवा पर्यटन हे केलेलेच असते त्यप्रमाणे मीही यावेळेस वडिलांसोबत प्र्यातानास गेलो होतो ते 'झीलों कि राणी नैनितालला ………।                                                                                                                                    आजच्या धाकाधुकीच्या आयुष्यात दररोजच्या तापमान बदल मुले मानव फारच वैतागला आहे .त्याला कुठे  न कुठे तरी निसर्गाच्या सानिध्याची आवश्यक्यता भासू लागली आहे त्यामुळेच तो शोठेथे जाऊन मनास  तृप्त करून घेतो.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही पर्यटनास जाणार होतो पण नैनिताल काहीतरी वेगळे आहे असे मला नेहमी वाटायचे.ज्या प्रमाणे गीरीप्रेमिना हिमालय खुणावतो त्याप्रमाणे मला देखील  नैनिताल खुणावत होते. दिवस  ठरला ७ मे २०१० सर्व प्रकारचे ट्रेन चे तिकीट  बुक झाले व माझ्या  आनंदाला  उधाण आले. जसा जसा प्रवासाचा दिवस जवळ  येऊ लागला तसा तसा माझ्या मनातला आनंदरूपी वारा माज्या  मनाला गुदगुल्या करून मला प्रवासाची आठवण करून देत होताऽअनि तो ७ मे उजाडला आज आनंदाच्या भारत मी काधीनावव्हे ते लवकर उठलो व  सर्व कामे आटपून सर्वात आधी   तयार झालोंअनत आनंदाची लकेर घेऊनच आम्ही नांदेडच्या  त्या रेल्वेस्थानकावर  आलो तेंव्हा 'सचखंड ऎक्स्प्रेस आमच्या स्वागता  साठी जणू काही सज्जच होती अत्यंत आनंदात आम्ही सर्व गाडीत बसलो व काही वेळातच गाडीने नांदेड सोडले व आमच्या आनंदाला पारावर उरला नाही दरमजल  करत आम्ही जालन्याला पोहचलो तेथे माझी बहिण आमच्या सोबत सामील झाली. रेल्वेच्या खिडकीतून बाहेरच्या जगाची अनुभूती घेत आम्ही प्रवास करत होतो व दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता आम्ही दिल्लीला उतरलो . दिल्ली भारताच्या राजधानी चे शहर  अत्यंत रुबाबदार दिसत होते.तेथिल गर्मी, गर्दी, ऊन  यामुळे सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला पण त्यामुळे तेथे राहत असलेल्या लोकन्बध्ल एक विलक्षण आदर निर्माण झाला    जसे जसे आम्ही पुढे  जाऊ लागलो तसे तसे आम्हाला दिल्लीच्या  प्रेक्षणीय स्थळांची महती कळू लागली . त्यावेळेस प्रथमच आम्ही मेट्रोचा अविष्कार पहिला . त्यानंतर आम्ही इंडिया गेट  इथे गेलो.तेथे गेल्यावर आम्हाला शहीद हिंदुस्थान वासीयांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. त्यनंतर दिल्लीतली  मज लुटण्यात आमचा दिवस कसा गेला हे कळलेच नाही .त्य दिवशी रात्री आम्ही 'रानीखेत एक्स्प्रेसने ' काठगोदाम येथे आलो .दिवसभर फिरून आल्यामुळे रात्री कधी झोप लागली हे कळलेच नाही. व सकाळी साडेसात वाजता आम्ही सर्व काठगोदाम येथे पोहोंचलो क़थ्गोदम या गावाचा अर्थ त्याच्या नावाप्रमाणेच होतो.एका  बाजूला विशाल सपाट मैदान तर  दुसर्या बाजूला गगनचुंबी पर्वत असे ते विहंगण दृश्य होते ऽअम्हि तेथे उतरलो तेथून नैनिताल ला जाण्यासाठी भरपुर  प्रमाणात  टॅक्सी असतात . तेथूनच आम्ही एक   टॅक्सी बुक केली व त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो .
                                        टॅक्सीमधील चालक फारच हुशार होता त्याने जाताना आम्हाला बर्याच वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती सांगितली ख़रतर  काठगोदाम ते नैनिताल हे अंतर ३६ किमी एवढेच होते परंतु घाटाच्या प्रवासमुळे आम्हाला ते अंतर पार करायला सुमारे एक तास लागला .एक बाजूला खोलच खोल दरी तर दुसर्या बाजूला उंचच उंच कडे अशा विहंगम दृश्यातून आम्ही पुढे पुढे जात होतो निसर्गाची  ती अद्भुत किमया भघताना  नैनिताल कधी आले ते आम्हाला कळलेच नाही नैनीताल  हे गाव अतिशय सुंदर असेच आहे ,हे गाव चार डोंगरांच्या मध्ये वसलेले असून त्यामध्ये एक सुंदर झील आहे. त्या झील चे नाव नैना झील असे असून .त्य झिल्च्या काठावरच नैना देवीचे मंदिर आहे व तसेच एक गुरुद्वारा सुद्धआ  आहेय़ झील चा आकार पूर्वी डोळ्यांसारखा होता त्यामुळे यास नैना झील असे म्हणत असत परंतु कालांतराने या झिल्च्या पश्चिमेकडील बाजू कोसळल्या मुले याझीलचा तो आकार बदलला व सध्या तो आंब्यासारखा झाला आहे . नैना झील हे सुमारे १२० फुट खोल असून त्यातील बोटिंगची मज काही औरच आहेंऐनितल हे गाव शिवालिक पर्वत रांगेत येते या पाव्तीय भागात मुख्यत्वे पाईन, देवदार ,ओक  यांसारखा वृक्षांची वने आढळतात य़ पर्वतीय भागाच्या पायथ्याच्या भागात सागवान वृक्षांचीही वने आढळतात

नैनिताल हे समुद्र सपाटीपासून सुमारे २००० मीटर उंचीवर आहे म्हणजेच ६००० फुट आहे . आम्ही दोन दिवसाच्या प्रवासातून जरी थकून आलेलो असलो तरी तेथे पोहोण्चल्यावर  आमचा थकवा चाक्क्चुर झाला . अत्यंत आनंदात आम्ही हॉटेल 'सिलबटन ' मध्ये प्रवेश केला . या हॉटेलला अत्यंत सुंदर असा व्हिव्ह्यु लाभला होता अगदी नैना झिल्च्या समोर असे ते हॉटेल होते .त्यदिवशी आम्ही लांबच्या प्रवासातून आलेलो असल्या मुले आम्ही  शहर नजीकची धीकाने पाहण्याचे ठरवलेले .त्या दिवशी आम्ही नैना झील मध्ये बोटिंग केली . या सुंदर अशा तलावाचा  स्पर्शदेखील मन प्रफुल्लित करणारा आहे . त्यानंतर आम्ही जवळच्या मालरोड ( बाजाराचे ठिकाण ) येथे गेलो . नैनितालचे  ते सौंदर्य भाघ्ण्यात आमचा तो दिवस कसा गेला ते कळलेच नाही .
दुसर्या दिवश आम्ही सकाळी जर लवकरच उठलो व अत्यंत आनंदात कुडकुडत तयार झालो कारण त्या दिवशी आम्ही जाणार होतो ते हिमालय दर्शन व नजीकच्या प्रेक्षणीय सरोवारांना. सकाळी ७ वाजताच आमचा वाहनचालक आला व त्याननंतर आम्ही निघालो .त्याला तिथल्या वातावरणाचे खूप ज्ञान होते व त्याचा फायदा आम्हा सर्वांना होत होता . सकाळी वातावरण चांगले असल्यामुळे आम्ही सर्व हिमाय दर्शनाच्या ठिकाणी गेलो हे ठिकाण नैनिताल पासून सुमारे २०० मिटर उंचीवर असून या ठिकाणावरून हिमालयाचे  दर्शन होते . अत्यंत आनंदात  आम्ही सर्व त्या पोइन्त्च्य दिशेने  जात होतो अगदी काही व्लेतच आम्ही त्या पोइन्त्वर पोहोंचलो व त्याचवेळी समोर दिसणा तो शुभ्र बर्फ प्फुन आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले . ती पर्वत रंग त्या शुभ्र कांती मुले व त्यावर पडणार्या चमकदार  सुर्याकीरणामुळे  झळाळून उठली होते .ते वैभव पाहून आम्ही शतशः निसर्गाचे    आभार मांडले व तेथून निघालो. आम्ही मनालीलाबर्फावर चालण्याची मज अनुभवली होती परंतु दूरवरून तिला पाहण्याची मज काही  औरच होती .तिथले  सौंदर्य  डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो .त्यनन्तर आम्ही खूप उंचीवर असणारे एक ठिकाण पहिले . तेथून दिसणारी ती खोल दरी पाहून मन भयग्रस्त झाले होते . त्यानंतर आम्ही पुढे ' बारा पथ्थ र ' हि शीला पहिली तो एक अतिउंच खडक  असून तो मोठ्या प्रमाणात ट्रेकिंगसाठी वापरला जातो .तेथुन खाली दृष्टी टाकल्यास एक गाईच्या पावलाच्या आकाराचे एक सरोवर दिसते . ते सरोवर अत्यंत निळाशार अश्या पाण्याने बनलेले असून त्याचा सहवास सुधा मन प्रसन्न करतो . या सरोवराचे वैशिष्ठ्य असे कि ते वर्षातून तीन वेळा त्याचा रंग बदलते .
                                                                                   ते विलोभनीय दृश्य पाहून आम्ही पुढे केव्ह गार्डन पाहण्यासाठी निघालो . हे गार्डन म्हणजे विविध गुहांचा समुदायच आहे . यात चित्ता , वाघ, अस्वल,साळींदर, सिंह, यांसारख्या प्राण्यांच्या गुहा आहेत . या गुहांमधून   फिरण्याची मज फारच विलक्षण आहे . यात काही गुहांमध्ये तर झोपूनच जावे लागते . या गुहांमधील खडक अत्यंत थंड असून जुनुकाही आपण एसी मध्ये बसलो आहोत असा भास होतो . वन्यजीव प्रेमींसाठी हे जागा अतिशय सुंदर आहे .



निसर्गाची ती किमया बघून  आम्ही पुढे निघालो .अतिशय हिरवेगार असे डोंगर व त्यामध्ये असलेले नितांत सुंदर झील पाहून मन अगदी भरून जात होते . निसर्गाने केलेली ती मज पाहताना
                  "हिरवा निसर्ग हा भवतीने,जीवन सफर करा मस्तीने "
                                     या ओळींची आठवण आल्यावाचून राहिली नाही  निसर्गाची जादू भघण्यात आमचा पुढचे ठिकाण म्हणजेच "सात ताल "कधी आले ते कळलेच नाही . सात ताल हे नैनिताल प्रमाणेच एक सरोवर असून ते सुद्धा सुमारे १२० फूट खोल आहे . या तलावात  सुद्धा आपल्याला बोटींगची मजा  अनुभवता येते . तेथे विविध सुंदर देखावे  सुद्धा उभे केले आहेत ते अतिशय नयनरम्य आहेत . तेथील नैसर्गिक सौंदर्य पाहून आम्ही पुढे " नाकुचीयाताल " येथे आलो. हे सुद्धा एक सरोवर असून ते सर्वात खोल आहे . या सरोवराला नऊ कोण असल्यामुळे याचे नाव " नाकुचीयाताल " असे पडले या विशाल सरोवराची खोली सुमारे १९० फुट आहे . नैनितालच्या भागातली हि सरोवरे एक प्रकारच्या भौगोलिक प्रक्रियेतून तयार झलेली आहेत . पावसाचे , तसेच नद्यांचे  पाणी दर्यांमध्ये साठत जाते व त्या दर्याचे मुख डोंगरांच्या पडझडींमुळे बंद झाल्या मुळे ते पाणी साठून अशी सरोवरे निर्माण होतात .त्यानंतर आम्ही निसर्गाची किमया भघत व पाईनची फुले वेचत आम्ही पुढे जात होतो . हि फुले अत्यंत आकर्षक असतात . ती वाळलेली फुले जुनू काही सुताराने केलेल्या नाक्शिकामासारखी असतात . तेथे नैनितालला ती फुले आकर्षक रंग व आकारात विकावयास असतात  . आम्ही जवळपास एक पिशवीभर फुले गोल केली . हि फुले वेचातच आम्ही भीमतालला गेलो.  भीमताल हे  एक सरोवर असून ते  नैना झील प्रमाणेच होते .भीमताल हे नाव भीमाच्या नावावरून पडले असून तेथे जवळच भीमाचे व महादेवाचे मंदिर आहे . अशी अख्याइका आहे कि भीम वनवासाच्या काळात येथे महादेवाची पूजा करत असे व त्यानेच हे देउळ  बांधले . भीमताल हे सरोवर सर्वात प्राचीन सरोवर असून ते नैनिताल च्याही पूर्वीचे आहे . येथे विविध प्रकारचे पक्षी दिसतात त्यांच्या रमणीय किलबिलाटात   हा परिसर अत्यंत विलोभनीय दिसतो . येथे इतक्या उंचीवरही माश्यांच्या विविध प्रजाती दिसून येतात . भिमतालचे ते विअत रूप पाहून आम्ही परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो . नैनितालला   आम्ही जैन्व्हा पोहोंचलो तोपर्यंत रात्र झाली होती . रात्रीच्या  वेळी नैनितालचे  ते वैभव सुवर्ण लंके सारखे दिसत होतेऽअज्चि दृश्ये आठवण्यात व उद्याची स्वप्ने रंगवण्यात रात्र कशी सरली ते कळलेच नाही .
                                                                                त्यानंतरच्या दिवशी आम्ही सार्वजण रानीखेत भघ्ण्यासाठी  निघालो . रानीखेत हे नैनिताल पासून ६० किमी दूरीवर असून ते अत्यंत सुंदर आहे रामिखेतला जाण्यापूर्वी आम्ही कैंची धाम येथे गेलो . तो परिसर अतिशय मनमोहक व सुंदर आहे . येथे असणार्या मंदिरातील स्वच्छता ,पवित्रता  पाहून आम्ही भारावून गेलो . रमणीय मंदिर , नदीचा येणारा  हळुवारसा आवाज , सभोवतालचे उंचच उंच पर्वत व त्यावरील हिरवा निसर्ग पाहून मन खरच मोहून जाते वाटते कि तिथेच राहावे . तेथे थोड्यावेळ व्यतीत करून आम्ही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो . जवळच एक नैसर्गिक ठिकाण होत ते म्हणजे बेडकाच्या आकाराचा नदीतील दगड . हा दगड नदी पात्रात अगदी मधोमध आहे व  त्याला आदळून पुढे जाणारा प्रवाह अत्यंत सुंदर दिसतो . पाणी उथळ असल्यामुळे आपल्याला त्या दगडापर्यंत जाता येते व  तेथे फोटोदेखील काढता येतात . हा सुंदर परिस पाहून आम्ही रंखेत काढे निघालो . रानीखेत हे गाव सुमारे १८०० मीटर उंचीवर असून ते एक प्राचीन शहर आहे . येथे असणार्या राणीच्या प्रीत्यर्थ या शहराला रानीखेत असे नाव पडले . इथे भारतीय लष्कराचे कॅम्प  सुद्धा आहेत . येथील गोल्फ गार्डन  देखील फार  प्रसिध्द आहे . येथे विविध राष्ट्रीय स्पर्धादेखील होतात . हि जागा ब्रिटीश काळात विकसित झाली . येथे मिल्ट्रीसाठी एक ध्यान मंदिर उभारले आहे त्याचे नाव आहे मन कामेश्वर मंदिर या मंदिराची स्थापना १९९३ मध्ये झाली . हे मंदिर अत्शय भव्य,शोभनीय , व मन प्रफुल्लीत करणारे एक जागृत स्थान आहे . रानीखेत मधून हिमालयाच्या रंगांचे दर्शन होते . तेथून आम्ही कालिका देवीचे मंदिर भाघ्ण्यास गेलो . तेथे जवळच एक चिल्ड्रन पार्क आहे . तेथे आम्ही सर्वांनी खूप मौज लुटली व परतीच्या प्रवासास लागलो ,.
                                                                       नैनिताल ला आल्यावर आम्ही शोप्पिंग केली . तेथे मेणाचे विविध प्रकार मिळतात उदा . मेणाचे दिवे, पुतळे ,शोभनीय आकर्षक वस्तू ,अश्या विविध गोष्टी मिळतात . तेथे खाण्यासाठी विविध प्रकारचे चाट धेखील मिळतात . त्या दिवशी त्या चविष्ट चाटचा    आस्वाद घेऊन आम्ही  आमच्या रूम वर आलो. रात्री जेंव्हा झोपण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मात्र झोपच येईना कारण आम्ही दुसर्या दिवशी परतीच्या प्रवासासाठी निघणार होतो. इतके दिवस अनुभवलेली ती गुलाबी ठुंडी आता आम्ही अनुभवणार नव्हतो तर आता आमच्या भेटीला पुन्हा तो आग ओकणारा सूर्य येणार होता या विचाराने मन व्याकूळ झाले. परंतु निसर्गाचे ते अचाट वैभव मला पाहता आले म्हणून मी त्या निसर्गाचे शतशः आभार मानले . आजून एक आनंदाची बातमी बाकी होती ती म्हणजे आम्ही आम्ही मुक्तेश्वर ला जाणार होतो .
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच नैनिताल सोडले  नैनिताल्चे  ते सौंदर्य  आम्ही  सोडून जात होतो या विचाराने मन भरून गेले . मुक्तेश्वर येथे शिवाचे मंदिर असून ते सुमारे ३५० वर्ष जुने आहे . ते मंदिर त्या गावाच्या सर्वात उंच ठिकाणी असून त्याची उंची सुमारे २२८६ मिटर एवढी आहे म्हणजे नैनिताल पेक्षा उंच . हि जागा अत्यंत प्राचीन सुधा आहे . पांडव स्वर्गारोहिनीला जाताना येथून पुढे मार्गस्थ झाले असे मानण्यात येते .



मुक्तेश्वर येथे बर्याच फिल्मचे शुटींग सुद्धा झालेले आहे . येथील एक कडा अत्यंत प्रसिद्ध असून तेथील उंची सुमारे २८०० मीटर एवढी आहे . तेथे ब्रिटीश कालीन संग्रहालय सुद्धा आहे . मुक्तेश्वर येथून जिम कार्बेट पार्क सुद्धा   जवळ आहे  अशाप्रकारे मुक्तेश्वर चे ते दैदिप्यमान रूप पाहून आम्ही परत काठगोदाम ला आलो . मनात खूप कालोहाल चालू होता . पुन्हा आपल्याला येथील मज अनुभवता येणार नाही म्हणून मनात आश्रू पाझरत होते . त्या दिवशी मी त्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी  कृतज्ञ झालो . व मनाला समजावले कि तुला परत या निसर्गाच्या कुशीत यायचाच आहे, येथील निसर्गाच्या  ओंजळीत बागडायचय  य़ेथिल रम्य वातावरणात तुला खुशाल डुंबायचय कारण तुला परत यायचय ,तुला परत यायचय ………।
                                                                                           - वेदांत तळणीकर