झाड पोखरले आहे …
खूप तहान लागली आहे मला
पण कुठे दिसत नाही गोड पाण्याचा झरा
मोकळा श्वास घ्यायचं मला
पण नाही दिसत वाहता झुळझुळता वारा
लख्ख प्रकाशाची भेट घ्यायची आहे मला
पण भक्तीचे दिवे तर निस्तेज होत आहेत
माणसांच्या घरी जाऊन बोलायचं मला
पण मनाचे ओठ तर बंद बंद आहेत
काल तरी कसे सगळे निरभ्रः ,सतेज होते !
आज कसे कोमेजलेले …. रसहीन झाले?
खरे सांगू ? मोहाने झाड पोखरले आहे
पाने फुले सावली नाही असे झाले आहे
- दत्ता हलसगीकर
No comments:
Post a Comment