ते दिवस खरच खूप छान होते
अवखळ ,खेळकर आणि वयानेही लहान होते
कसे निघून गेले कधी कळलंच नाही
मनासारखं प्रत्येकाला अजून छळलच नाही
खरी मजा तेंव्हाच केली विसरता न येणारी
भांडण करूनही सर्वाना अलगद समजून घेणारी
भांडण करायला तेंव्हा विषय कोठे होता ?
आणि भांडणाला विषय लागतो
असा नियम तरी कोठे होता ?
क्रिकेट आणि बेसबॉलची आवड जर जास्तच होती
खर सांगू तेंव्हा आपली टीमच आशी मस्त होती
दिवसभर धुडगूस नुसता तहान भूक विसरून जायचो
जर भूक लागली कि गच्चीत जाऊन पापड्या खायचो !
एकमेकांच्या चहाड्या करत दुपार टळून जायची
संध्याकाळी परत आपली मैत्री फुलून यायची
पटकन व्हायचो एकत्र आणि सुरु व्हायचा खेळ
आणि क्षणभरात निघून जायचा संध्याकाळचा वेळ !
जेवणासाठी आयांच्या हाका सुरु झालेल्या
त्याचवेळी आपला खेळ ऐन रंगत आलेला
थांब थांब म्हणता म्हणता खूप वेळ जायचा
अन थोड्यावेळाने सगळ्यांच्या आय लाटणे घेऊन यायच्या
सुट्टीच्या दिवशी सगळे फिरायला जायचो
सगळे प्रोग्राम कॅन्सल करून मुद्दाम भेटायला यायचो
भेल ,दाबेली ,पाणिपुरी मनसोक्त खायचो
अन भर उन्हाळ्यात मग स्वेटर घालून फिरायचो
आता मात्र भेटायसाठी वेळ शोधावा लागतोय
भेटायलाही आता कॅलेंडरचा मुहूर्त शोधावा लागतो
न भेटण्याची कारण सुद्धा तयार ठेवलीत सगळ्यांनी
आठवणींचे थवे सोडलेत मनात आल्या गेल्यांनी
कोण कुठे निघून गेल आता काही पत्ताही लागत नाही
भेटू म्हणल तरी कोणी भेटत नाही
संपले ते दिवस ,आता आठवणी फक्त ताज्या आहेत
तुमच्या आहेत का माहीत नाही
पण आजून तरी त्या माझ्या आहेत!
chan
ReplyDelete