कणा ……….
"ओळखलत का सर मला " पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला , बोलला वरती पाहून ;
' गंगामाई ' पाहुनी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली , चूल विजली , होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे , चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
" पैसा नको सर , जर एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा …."
- { कुसुमाग्रज}
No comments:
Post a Comment