सिक्कीम प्रवास वर्णन
" हिमालयाची महती कुणाला ग वर्णवेल ,पातळाचा हि थकेल सहस्त्रफणी "
खरच या ईश्वराने आपल्याला जे अद्भुत, किमयागार अविष्कार दाखवले आहेत त्या पैकी सर्वात अग्रगन्य आहे तो ' हिमालय '. प्रत्येकालाच कशाची न कशाची आवड हि असतेच, तशी मला देखील डोंगरदऱ्यात फिरण्याची येथील मजा अनुभवण्याची फारच आवड आहे. चातकाला जशी वरुणाची ओढ असते, नदीला जशी समुद्राला भेटण्याची ओढ असते तशी मला देखील हिमालयाच्या संगतीची फारच आवड आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मग आम्ही मुहूर्त शोधला आणि आम्ही जवळपास पंधरा जण निघालो एका नवीन सफरीवर, ते हिमालयाचा मेरुमणी असणारा प्रदेश म्हणजेच सिक्कीम चा प्रदेश. पर्यटनाची आवड मनाला स्वस्थ बसू देत नाही हे तितकेच खरे आहे म्हणूनच प्रवास हि गोष्ट अशी आहे जी माणसाला विविध गुणांनी समृद्ध करते आणि जीवनाची मजा सुद्धा अनुभवायास देते.
भारताच्या ईश्यान्येकडे स्थित असलेले सिक्कीम हे खरे तर अत्यंत छोटेसे राज्य परंतु त्याच्यातील अगाध,निस्सीम सौंदर्यामुळे ते भारतीय भूमीतील सौंदर्याचा मुकुट मनीच शोभून दिसते . अशा सिक्कीमला जाण्यासाठी माझे मन खरोखरच खूप आतुर झाले होतेआणि दिवस ठरला २५ मे २०१२, या दिवशी आम्ही सर्व जन नांदेड हून धनबाद गाडीने निघालो सुरुवातीला आम्ही वाराणसी येथे गेलो , वाराणसी हे सर्व धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असे स्थळ आहे य़ स्थळाची महतीअगदी अनादिकालापासून आहे. य़ेथिल गंगामाता येथील पावित्र्याचे जागृक प्रतीकच आहे . या क्षेत्री गंगा नदीवर सुमारे ३६५ घाट बांधले आहेत .राजा हरीश्चन्द्रापासून पेशवाई पर्यंतचे अनेक घाट येथे आहेत. आम्ही सकाळीच वाराणसी येथे पोहोंचलो असल्यामुळे आम्ही तेथिल विविध घाट तसेच मंदिरे पहिली .तेथिल अत्यंत पवित्र अशा काशी विश्वेश्वराचे दर्शन हि घेतले .रात्री साडेदहा वाजता आम्ही तेथून राजधानी एक्स्प्रेस मध्ये बसलो सिक्कीम हे राज्य पश्चिम बंगालच्या उत्तरेला आहे व या राज्याला सुमारे तीन देशांच्या सीमा स्पर्श करतात त्या म्हणजे चीन, नेपाल, आणि भूतान . दुसर्या दिवशी साडे बारा वाजता आम्ह न्यू जलपायगुरी येथे पोहोंचलो . हे गाव गुवाहाटी कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आहे . येथूनच दार्जिलिंगला जाण्यासाठी टॉय ट्रेन आहे .दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल मधील हिल स्टेशन आहे आहे . आम्ही नांदेड मधूनच सनफ्लॉवर ट्रॅव्हल्स कडून आधीच बुकिंग केलेले असल्यामुळे आम्हाला न्यू जलपायगुरी स्टेशनवर गाडी आलेली होती . येथून खरा आमचा डोंगर दऱ्यांच्या व नदीच्या सोबत प्रवास सुरु होत होता . नदीचा येणारा तो झुळझुळ आवाज मनाला हर्शोह्लासित करत होता. निसर्गाच्या स्पर्शाने आम्हा सर्वांचे मन उधान वाऱ्यागत होऊन आनंदाने डोलू लागले आशा भारावल्या मनःस्थितीत आमचा प्रवास सुरू होता . आमच्या सोबत अखंडपणे आमचा हात धरून निसर्ग दाखवणारी तिस्ता नदी खळखळाटाने वाहत होती मजल दर मजल करत आम्ही सिक्कीमची राजधानी गंगटोक इथे प्रवास करत होतो .
हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
या ओळीचा आस्वाद घेत होतो . सिक्कीमचा हा प्रदेश म्हणजे हिमालयाचा अति पूर्वेकडील भाग आहे आशा या हिमालयाच्या सानिध्यात प्रवास करत आम्ही सायंकाळी ५. ३० वाजता गंगतोक इथे पोहोण्च्लो . तेथील थंडावा शरीराला हुडहुडी भरवत होता . तिथे आमच्या लॉजवर स्नान करून गंगटोक येथील प्रसिद्ध मार्केट एम . जी रोड येथे फिरावयास आलो . एम जी रोडवरील ती स्वच्छता ,शिस्त, डेकोरेशन पाहून डोळ्यांचे पारणे फिटले दिवसभर प्रवासाच्या थकव्यामुळे आम्ही कधी निद्राधीन झालो ते कळलेच नाही
त्या दिवशी आम्ही जर लवकरच झोपलो . कारण दुसर्या दिवशी पहाटेच आम्ही निघणार होतो ते सिक्कीम स्पेशल ,बर्फाचाडीत लाचुंगला . लाचुंगच्या भागाची उंची सुमारे १२००० फुट आहे . इतक्या प्रचंड उंचीवर असूनही हे गाव अत्यंत सुंदर आहे . गंगटोक पासून लाचुंगचे अंतर हे सुमारे १२० किमी आहे . सकाळी आम्ही आमच्या हॉटेलवरच नष्ट केला व त्यानंतर निघालो .लचुङ्ग्ल जातानाचा रस्ता अत्यंत कठीण असल्यामुळे तेथे फक्त फोर्से च्या जीपच जाऊ शकत होत्या , आमच्या मॅनेजरने तेथे अगोदरच जीपची व्यवस्था करून ठेवली होति. लाचुन्ग्ला जाणारा रस्ता म्हणजे अक्षरशः उभी चढण .व सततचा पाऊस यामुळे रस्त्यावरूनही बरेच ठिकाणी पाण्याचे प्रवाह जात होते . परंतु आम्ही निघाल्या नंतर काही वेळातच वातावरण स्वच्छ झाले. व त्या सुंदर अशा निसर्ग देवतेच्या निरागस रूपाचे दर्शन आम्हाला झाले . येथून पुढे जाताना आम्ही सुरुवातीला "सेव्हन सिस्टर फॉल्स " या धबधब्या जवळ गेलो य़ फॉल्स च्या नवा प्रमाणेच हा धबधबा अत्यंत उंच अशा डोंगरावरून येतो व तो जवळपास सात वेळा एका कड्या वरून दुसर्या कड्यावर पडतो . हे दृश्य अत्यंत विहंगम असे दिसते .याचा तो सात वेळा पडणारा प्रवाह अत्यंत मन मोहक दिसतो . तेथे जवळ जाऊन आपल्याला त्या धबधब्याचे दर्शन घेत येते .त्यानंतर आम्ही

" गिरीचे मस्तकी गंगा ,तेथुनि चालली बळे
धबाबा लोटल्या धारा ,धबाबा तोय आदळे
गर्जतो मेघ तो सिंधू,ध्वनी कल्लोळ उठिला
कड्यासी आदळे धारा ,वात आवर्त होत असे "
या रामदास स्वामींच्या उक्तीची आठवण आल्या वाचून राहिली नाही . हा प्रदेश म्हणजे सुचीपर्णी वृक्षांची दाट आराण्ये
,गगनचुंबी शिखरे , असंख्य फुले ,खळ खळ नाऱ्या नद्या ,नाना रंग रूपाचे पक्षी असे हिमालयाचे गोंडस रूप आहे . येथल्या प्रवासात आम्ही जसे जसे पुढे जाऊ लागलो तशी तशी निसर्गाची नवनवीन रूपे आमच्या दृष्टीस पद्लि. उंच उंच हिमधवल शिखरांच्या कुशीतून वळणा वळणाने आमची गाडी पुढे सरकत होती .बाल्ति,लडाखी,दार्द ,नेपाली,भोतीया,लेपचा,आणि अशाच कितीतरी मंडळींचे हिमालय हे
पिढ्यानपिढ्यांचे निवास्थान .धर्म -संस्कृती ,भाषा -पेहराव,आहार-विहार, हि मंडळी आपल्या पेक्षा खूपच वेगळी परंतु या लोकांची प्रामाणिकता खरोखरच वाखाणण्या जोगी होती .येथील driver पासून सर्व लोकांनी आम्हाला सढळ हातांनी मदत केली . हि माणसे तेथील निसर्ग प्रमाणेच पहाडी हृदयाची होती . बर्फाच्छादित गिरिशिखरे ,उंच उंच खिंडी, जलप्रवाह , यांच्या साथीने निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही सर्व लाचुंग ला सायंकाळी साडे सात वाजता पोहोंचलो पहाडी भागात सतत होणारा पाउस ,रस्त्यावर असलेली चिकन माती , यामुळे सरासरी एक तासात केवळ १२ ते १५ किमी अंतर पार होते . त्यामुळेच आम्हाला या लाचुंग ला पोहोन्च्ण्यासाठी सायंकाळ उजाडली . लाचुंग हे सिक्कीमच्या उत्तरे कडे वसलेले एक लहानसे टुमदार गाव असून त्याची उंची सुमारे ९,६०० फुट एवढी आहे . या गावातून लाचेन हि तिस्ता नदीची उपनदी वाहते .लाचुंग हे गाव अत्यंत सुंदर व प्रेक्षणीय तेथील valley बघण्यासाठी बाहेरच्या देशातून सुद्धा पर्यटक येतात . परंतु आम्ही ज्या वेळेस तिथे पोहोंचलो त्या वेळेस बराचसा अंधार पडला होता . रात्रीच्या त्या काळोखात निसर्गाचे ते रूप अत्यंत गूढ वाटत होते . तेथील काळोख ,शांतता तेथील परिसराची जाणीव करून देत होती . त्या छोट्याश्या गावात आम्ही एका लोज वर उतरलो ती रात्र आम्हाला तेथे काढायची होती . ते हॉटेल डोंगराच्या एका कड्यावर वसलेले होते त्याची बांधणी लाकडाचीच होती .त्य हॉटेलच्या खालून पाण्याचा एक प्रवाह {ओढा } जात होता . रात्रीची ती निरव शांतता भेदणारा नद्यांचा खळखळाट ,नभातील मेघांचा गडगडाट , मधूनच चमकणारी वीज व अचानक सुरु होणारा पाउस असे ते निसर्गाचे अनोखे ,गूढ रूप आम्ही सर्व त्या दिवशी पाहात होतो."निबिड दाटली छाया त्यामध्ये ओघ वाहती " असे काहीसे ते रूप होते.
अंगात तीन तीन टी शर्ट घालून सुद्धा तेथे ऊब मिळत नवती एवढी भीषण थंडी थेथे होती आणि तीही जून मध्ये . पहाडी भागात सूर्यास्त व सूर्योदय बराच लवकर होतो तिथे साधारणतः सकाळी पाच वाजताच उजाडलेले असते . त्या मुळे दुसऱ्या दिवशी लवकरच आम्ही ५:३० वाजता " "युम्थांग valley " व " zero point " बघन्या करता निघालो . रात्रीच्या त्या भिषणतेनंतर जेंव्हा आम्ही सकाळी उठलो व आजू बाजूला पहिले तेंव्हा खरच सांगू मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . चारी बाजूंनी सुंदर हिमाच्छादित शिखरे व त्या मध्ये बसलेले हे टुमदार गाव असे अविश्वसनीय आसे ते मनोहर दृश्य होते . हिमालयाच्या त्या भव्यातेकडे पाहून त्याच्या पुढे अलगदच माझे माथे नमले व त्या नागधीराजास मी मनोमन अभिवादन केले . त्या दिवशी आम्ही जात होतो त्या नागधीराजाच्या कुशीत खेळण्यासाठी व त्याच्या मखमली धवल बर्फात नाहून जाण्यासाठी . आम्ही युम्थांग valley साठी प्रयाण केले. लाचुंग पासून पुढचा रस्ता म्हणजे driverची कसोटी पाहणारा होता . इथे आम्हला हिमालयाचे रौद्र रूप दिसून येत होते . क्षणोक्षणी मृत्यू जणू जबडा आ वासून बसलेला होता . किंचीतशी चूकही येथे माफक नव्हती . रस्त्याच्या एका बाजूला दरी ,रस्ता कसला तो केवेळ मातीचा रस्ता आणि पाउसमुले तो उला झाला होता त्यावरुन जातांना गाडीचे तयार घसरत होते . परंतु अशातही ती "हिमशिखरे" आम्हाला साद घालत होती .
. ती शिखरे आम्हाला धैर्यही देत होति. त्या वेळी कळले हिमालायचे आव्हान पेलणे काही सोपे नाही . जिथे सार्या डोंगररांगांची उंची संपते तेथून हिमालय सुरु होतो . आठ हजार मीटर हून अधिक उंच असलेली तब्बल चौदा शिखरे केवेल या हिमालयातच आहेत . अशा या एकमेवाद्वितीय हिमालयाची सुंदरता ,भीषणता पाहत आम्ही पुढे सरकत होतो . युम्थांग valley ला मागे टाकून आम्ही आधी "zero point" ला जाण्याचे ठरवले कारण तेथील वातावरणाशी आपल्याला कधी मेल घालता येत नाही .एक्द का वातावरण भिघ्डले कि आपले काहीच पाहणे होणार नाही म्हणून आम्ही पुढे निघालो . नुकतेच उन पडले होते व त्या उन्हात झळाळणारा बर्फ मला पहायचा होता . म्हणून माझे मन खूपच आतुर झाले होते . हा "zero point " लाचुंग पासून सुमारे ५० किमी दूर आहे परंतु तिथे पोहोन्चायला आम्हाला जवळ अडीच तास लागला . अंगात दोन स्वेटर घालून सुद्धा आम्ही काकडत होतो .तिथे जाण्यासाठीसुद्धा वेगळा पोशाख मिळतो तो सुद्धा आम्ही घातला होता ।तिथे जाताना ल दिसणारे सौंदर्य मन हर्षून जात होते .
तिथे जेंव्हा आम्ही पोहोंचलो तेंव्हा हाडे घोठवणाऱ्या थंडीने अनेकांना चक्करा आल्या . तेथील वातावरणाशी जुळवून घ्यायला बऱ्याच जणांना वेळ लागला कारण तिथे oxygen ची कमतरता असते. पण आम्ही मुल मात्र अत्यंत आनंदात व उत्साहात होतो ।तशि बर्फावर चालण्याची माझी हि दुसरी वेळ होती कारण या आधी आम्ही मनाली ला असच रोहतांगपास येथे बर्फावर खेळलो होतो . परंतु तिथे उंची कमी होती येथे उंची खूपच जास्त होती . हे ठिकाण समुद्र सपाटी पासून सुमारे १६,००० फुट उंचीवर होते . त्या वेळी विचार आला एव्हरेस्टची उंची तर याहीपेक्षा तिप्पट आहे , इथेच आपले असे होत आहे तर तिथे जाणार्या गिर्यारोहकांची तर कशी परीस्थिती असेल . तो परिसर एखाद्या हिमनगरी प्रमाणेच शोभून दिसत होता . त्या सौंदर्याने आम्ही इतके रममाण झालो होतो कि एकमेकांच्या अंगावर बर्फ फेकणे ,बर्फावरून खाली घसरत येणे ,यात आमचे पूर्ण कपडे ऒले झाले होते . आता लिहितांनाही तीच जाणीव ,तीच अवस्था , मजा आनुभवायास येत आहे . .टी व्हि च्या पडद्यावरून बर्फ बघणाऱ्या व्यक्तींना याची कल्पनाच करता येणार नाही असे क्षण आपल्या आयुष्यात फारच कमी वेळा येतात परंतु आयुष्याच्या असंख्य क्षणांपैकी हे मोजकेच अजरामर असतात . त्यांचा खोल ठसा आपल्या मनावर उमटतो .
अशा त्या हिमनगरीतून परतावयास मन तयारच होत नव्हते पण जास्त मोह सुद्धा घातकच असतो . त्यामुळे आम्ही परत फिरलो तिथला तो अद्भुत निसर्ग पाहून मला वाटले
ढगात हरवली
वळणांची ती वाट
उरात शिरशिरी
हा हिमालयाचा घाट …….
हवेतील तो गारवा , ती गुलाबी थंडी ,तो किमयागार निसर्ग असे ते रूप डोळ्यात साठवून आम्ही परत फिरलो . परततांना आम्ही युम्थांग valley येथे आलो .उंच पर्वत माथा,त्यामध्ये पठारी प्रदेश ,पक्ष्यांचा किलबिलाट , नद्यांचा खळखळाट,शिखरांच्या डोक्यावर हिम ,व तो थंडावा असे काहीसे त्या युम्थांग valley चे द्र्य्श्य होते. त्या valley चे सौंदर्य अत्यंत अद्भुत होते स्वर्गालाही लाजवेल आस तिथला थाट होता. या valley त आम्हाला याक नावाचा प्राणी पहावयास मिळाला . हा प्राणी म्हणजे या प्रदेशाची शानच आहे ,काळ्या रंगाची पाठ त्यावर केसांचा प्रचंड झुबका व शिरावर फक्त शुभ्र हिमाप्रमाणे पांढरे कुरुळे
केस असा तो बलदंड शरीरधारी होता . त्या गीरीशिखारांचे ते अद्भुत सौंदर्य पहिल्या नंतर आता आम्हला ऒढ लागली ती खाली सुरक्षित खाली पोहोन्च्ण्याची .परन्तु निसर्गाच्या अद्वितीय रुपात आमचा प्रवास कसा सरला व कधी आम्ही लाचुंग ला पोहोंचलो ते कळलेच नाही . आता आम्हाला गंगटोक ला परत निघायचे होते . त्या भागात आपल्या सारखी पोळी भाजी मिळत नाही .तेथे आम्ही मग दाल भात खाउनआम्ही परतीच्या प्रवासास लागलो . परतीच्या प्रवासात आम्ही जर लवकरच गंग्तोकला पोहोचलो . त्या दिवशी दिवसभर प्रवास झाल्यामुळे आम्ही भरपूर थकलो होतो ऱत्रि ९:३० वाजता आम्ही जेवण केले .व त्यानंतर आम्ही आमच्या रूम वर आलो . त्याच्या दुसर्या दिवशी आम्ही जाणार होतो ते " नथुला पास" येथे .परन्तु आमच्या टूर मेनेजरने आम्हाला सांगितले कि त्या भागात लॅन्ड स्लाईडींन्ग झाल्यामुळे तेथे अनेक गाड्या आडकून पडल्या आहेत तर आपण उद्या दक्षिण सिक्कीम बघण्यासाठी जाऊया . आमच्या कडे एक दिवस रिकामा असल्याने आम्ही त्या भागात जाण्याचे ठरवले व दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो . दक्षिण सीक्किम चा भाग म्हणजे खरे तर कमी उंचीचा प्रदेश .परन्तु या भागाचे सौंदर्य आहे ते येथील चहाचे माले व त्यांनी झाकलेली विस्तीर्ण आशी डोंगररांगा . सुरुवातीला आम्ही ती गार्डन बघण्यासाठी निघालो . हे ठिकाण गंगटोक पासून सुमारे ८० किमी आहे य़ भागात आम्हाला हिमधवल शिखरे दिसणार नव्हती परंतु हिरवा निसर्ग आमच्या सोबतीला होता . पर्वतांनी जणूकाही हिरव्यागार रंगाची दुलईच पांघरली आहे असे ते अल्ल्हाददाई दृश्य होते . या भागात सुचीपर्णी वृक्षांची भरपूर जंगले आहेत . विविध पक्षी या भागात आपल्या सुमधुर कुन्जनाने हा परिसर नादमय करून सोडतात .
सिक्कीमचा राज्य प्राणी असलेला " लाल पांडा " येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो . येथील चहा आगदी जगभरात प्रसिद्ध आहे .तेथिल एका ठिकाणी आम्ही तेथील चहा विकत सुद्धा घेतला .ते चहाचे मळे पाहून आम्ही एका बुद्ध मंदिराकडे गेलो . हे मंदिर गौतम बुद्धांचे शिष्य स्वामी पद्म्संभावा यांचे आहे .तेथे बुद्ध धर्मियांचे गुरु दलाई लामा अनेक वेळा वास्तव्यास येत असतात. मंदिराच्या वर स्वामी पद्म्संभावा यांची उंचच्या उंच मूर्ती आहे . हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे आठ हजार फुट उंचीवर आहे . या मंदिरात एक ध्यानगृह सुद्धा आहे . एव्हढे प्रशस्त मंदिर पाहून खरच डोळ्यांचे पारणे फिटते याच ठिकाणाहून पुढच्या डोंगरावरची उंच शंकरांची मूर्ती दिसते . हे बुद्ध मंदिर पाहून झाल्यावर आम्हाला त्या मुर्तीपाशीच जायचे होते . हि मूर्ती स्थित असलेले ठिकाण म्हणजे " श्री सिद्धेश्वर धाम " होय . त्या ठिकाणी जाण्या साठी आम्ही मंदिर उतरून पुढचा प्रवास सुरु केला . सभोवतालचा शांत थंड निसर्ग फारच हृदयस्पर्शी वाटत होता . विविध पक्षी , फुलपाखरे, फुले पाहून मन प्रसन्न होत होते .
मधून दिसे मृदू
पुष्पांचा ताटवा
रंगीत सानुल्या
फुलपाखरांचा थवा ……
असे काहीसे इथले सौंदर्य होते . काही वेळातच आम्ही सिद्धेश्वर धाम येथे पोहोचलो. हे ठिकाण २००५ साली सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी बांधले . ह्या ठिकाणी चार धाम,व बारा ज्योतिर्लिंग यांच्या मंदिरांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत . इथ श्री साई मंदिर व शंकरांची सुद्धा १०८ फुटांची भव्य मूर्ती आहे . ती मूर्ती तेथील भव्यतेची साद देते . हे सिद्धेश्वर धाम पाहून आम्ही परत गंगटोक च्या मार्गाला लागलो . परतीचा प्रवास करतांना आम्ही आमच्या driver च्या घरी गेलो त्याच्या घरी आम्हाला सिक्कीमचा विशिष्ट पदार्थ " मोमो" याची चव चाखता आली . एव्हाना संध्याकाळ झाली होती व थंडीचा ऒघ वाढत होता . अशा त्या थंडीत ते मोमो व त्याबरोबर गरम गरम सूप पिण्याची मज काही ओउरच होती. हे मोमोज खाऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासासाठी लागलो निसर्गाच्या सानिध्यात आम्ही पूर्णपणे देहभान हरपलेले होतो ना आम्हाला घराची आठवण येत होती न आम्हाला घरी जायची ऒढ लागली होती . मजल दरमजल करत आम्ही गंगटोक येथे पोहोंचलो.
त्य दिवशी रात्री आम्ही एम . जि. रोडवर बऱ्यापैकी खरेदी केली व त्यानंतर हॉटेलवर गेलो . सिक्कीमला अनेक देशांची सीमा लाभली आहे . त्यात चीन हा बलाढ्य देश त्याच्या उत्तर सीमेकडे आहे . १९६२ सालचे चीन सोबतचे युद्ध ते याच भागातले. सिक्कीमच्या "नाथूलापास "या ठिकाणी भारत आणि चीन यांची सीमा आहे .तर दुसर्या दिवशी आम्ही निघणार होतो ते नथुला पासला य़ नथुलापासला जाण्यासाठी आधी तेथील आर्मिकडून परमिट काढावी लागते . आमच्या टूर मॅनेजरने आम्ही तिथे येण्याच्या आधीच तेथील परमिट काढून ठेवली होती त्यामुळे आम्हाला तेथे जाणे सोयीस्कर झाले . त्या दिवशी आम्ही लवकर निघालो नाथुलाचा हा प्रदेश सुद्धा १५००० फुट उंच आहे . इतक्या उंच ठीकानी अशा कठीण वातावरणात आपले जवान कसे काय तेथील परिस्थीतीचा सामना करतात हे कुतूहल पूर्ण करण्यासाठी मला तेथे जाण्याची ऒढ लागली होती . गंगटोकपासून हि सीमा फक्त ६० किमी एवढ्या अंतरावर आहे .तेथे जातानाचा रस्ता हा अत्यंत दुर्गम असून तो अक्षरशः खड्या चढणीचा आहे .
सतत होणाऱ्या लॅन्ड स्लाईडींन्गमुळे इथील रस्ता सदैव खराबच असतो . तो भाग पूर्णपणे आर्मी साठी राखून ठेवला आहे य़ भागात लोकांच्या वस्त्या फारच कमी प्रमाणात दिसून येतात ज़गोजागी आर्मीचे विशाल कॅम्प दिसतात. येथील जवानांच्या ड्यूटी ६ महिन्यांच्या असतात . इथे येणारे जवान भारतातील विविध प्रदेशातून येत असल्यामुळे त्यांना येथील वातावरण लागू व्हावे यासाठी ह्या कॅम्पमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात येते . अनेक जवान तेथे पर्यटकांच्या गाड्यांना त्रास होउने यासाठीही जागरूक असतात . तेथे जाताना लागणाऱ्या निसर्गाची किमया ,व भारतीय जवानांची देशभक्ती पाहत आम्ही पुढे जात होतो . जवळजवळ आदीच तासांनी आम्ही नथुला पासच्या बॉर्डरच्या मेन गेटपाशी पोहोंचलो.
wow!! its nice!!
ReplyDelete