प्रत्येकात अदभुत अस काहीस दडलेलंच असत, काहीतरी नाविन्य, कला, ज्ञान, विचार यां गुणांनी समृद्ध असण तर चांगलच पण कलागुणांना अगदी सहजतेने इतरांना आपल्या ओंजळीतून अर्पण करण्याची वृत्ती बाळगणं अत्युत्तम .... आणि आपण देऊ शकतो अशा भरपूर गोष्टी आहेत फक्त त्या शोधण्याची इच्छा आपल्यात जागृत व्हावी....
ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले ,
त्यांनी दोन गाणी द्यावीत .
सूर्यकुलाशी ज्यांचे नाते
त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगांचा अंधार जेथे,
पहाटेचा गाव न्यावा.
ज्यांच्या अंगणी ढग झुकले,
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी,
रिते करून भरून घ्यावे .
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडेसे खाली यावे .
मातीत ज्यांचे जन्म मळले ,
त्यांना उचलून वरती घ्यावे .....
------ दत्ता हलसगीकर
संकलित
इयत्ता आठवी बालभारती
ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले ,
त्यांनी दोन गाणी द्यावीत .
सूर्यकुलाशी ज्यांचे नाते
त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगांचा अंधार जेथे,
पहाटेचा गाव न्यावा.
ज्यांच्या अंगणी ढग झुकले,
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी,
रिते करून भरून घ्यावे .
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडेसे खाली यावे .
मातीत ज्यांचे जन्म मळले ,
त्यांना उचलून वरती घ्यावे .....
------ दत्ता हलसगीकर
संकलित
इयत्ता आठवी बालभारती