सकाळ
ये अवखळ पोरीसमान आज सकाळ ,
तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ ;
नादात वाजवीत रुमझुम आपुले चाळ ,
घरट्यातुनि उडवी खगास हीच खट्याळ .
करी आनंदाचे मोरपीस घेउनि,
गुदगुल्या करी मज गालावरी फिरवोनी ;
गुणगुणत स्वतःशी वारा अधिरे गाणे,
अन फुगडी घाली घालीत मजसी उखाणे.
हे उन केशरी लोळण घेई अंकी,
लुसलुशीत कोवळी निर्मळ बाळतनू कि ;
तृणपर्णी हसते दव मिचकावीत डोळे,
भिजवीते वसन मम लावूनिया कर ऒले
तरुवेलींवरती फुलला सुमसंभार,
लडिवाळ हास्य हे सकाळचे अनिवार;
मैत्रीण तिची हि निळी टेकडी वेडी,
मखमलीचा परकर आज ल्यावया काढी
घेऊन ओढणी जरतारी सुकुमार,
मज खुणाविते , ' ये बनुनी अवखळ पोर ';
अन मलाही वाटे मुक्त सोडूनी केश
लेऊन परीसम हलका निळसर वेश ….
होऊन तरल या वाऱ्यासम धावावे,
सोनेरी असल्या उन्हात मिसळूनी जावे ;
गुदगुल्या कराव्या मूर्त बनुनी आनंद,
गुणगुणत बसावे स्वतःशीच स्वच्छंद
सुमानापरी निर्मळ हसुनी जगा हसवावे,
अन विहंग बनुनी आकाशी विहरावे ;
या लीन तृणले दव बनुनी नटवावे,
अन माझ्यातूनि मी निसटुनी सकाळ व्हावे …
---{ पद्मा गोळे }
( बालभारती इयत्ता आठवी )
ये अवखळ पोरीसमान आज सकाळ ,
तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ ;
नादात वाजवीत रुमझुम आपुले चाळ ,
घरट्यातुनि उडवी खगास हीच खट्याळ .
करी आनंदाचे मोरपीस घेउनि,
गुदगुल्या करी मज गालावरी फिरवोनी ;
गुणगुणत स्वतःशी वारा अधिरे गाणे,
अन फुगडी घाली घालीत मजसी उखाणे.
हे उन केशरी लोळण घेई अंकी,
लुसलुशीत कोवळी निर्मळ बाळतनू कि ;
तृणपर्णी हसते दव मिचकावीत डोळे,
भिजवीते वसन मम लावूनिया कर ऒले
तरुवेलींवरती फुलला सुमसंभार,
लडिवाळ हास्य हे सकाळचे अनिवार;
मैत्रीण तिची हि निळी टेकडी वेडी,
मखमलीचा परकर आज ल्यावया काढी
घेऊन ओढणी जरतारी सुकुमार,
मज खुणाविते , ' ये बनुनी अवखळ पोर ';
अन मलाही वाटे मुक्त सोडूनी केश
लेऊन परीसम हलका निळसर वेश ….
होऊन तरल या वाऱ्यासम धावावे,
सोनेरी असल्या उन्हात मिसळूनी जावे ;
गुदगुल्या कराव्या मूर्त बनुनी आनंद,
गुणगुणत बसावे स्वतःशीच स्वच्छंद
सुमानापरी निर्मळ हसुनी जगा हसवावे,
अन विहंग बनुनी आकाशी विहरावे ;
या लीन तृणले दव बनुनी नटवावे,
अन माझ्यातूनि मी निसटुनी सकाळ व्हावे …
---{ पद्मा गोळे }
( बालभारती इयत्ता आठवी )
No comments:
Post a Comment