माझ्या मराठी मातीचा ,
लावा ललाटास टिळा ;
हिच्या स्पर्शाने जागल्या ,
महाराष्ट्रातील शिळा .
हिच्या कुशीत जन्मले , काळे कणखर हात ;
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात .
नाही पसरला कर , कधी मागायास दान ;
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान .
हिच्या गगनांत घुमे , आद्य स्वातंत्र्याची द्वाही ;
हिच्या पुत्रांच्या बाहूत , आहे समतेची ग्वाही .
माझ्या मराठी मातीचा ,
लावा ललाटास टिळा ;
हिच्या संगे जागतील ,
मायदेशातील शिळा .
- { कुसुमाग्रज }
No comments:
Post a Comment