Sunday, June 14, 2015

समुद्राच्या किनाऱ्यावर...(samudrachya kinaryavar)

समुद्राच्या किनाऱ्यावर  फिरतांना 
वाऱ्याशी मेळ  जुळतो 
फिरता फिरता वाऱ्यागत  मग 
स्वतःवरचा ताबा सुटतो ……… 

भिरभिरणाऱ्या पक्षांगत  मग जाते ते उंच नभी 
आकाशाच्या सिमांनाही मग 
त्या दर्येचा स्पर्श होतो …… 
स्पर्शातून मग त्या 
अथांगतेला दृष्टी येते 
फेसाळणाऱ्या  लाटेवरती आरूढ होऊन मग ते 
किनाऱ्याची  चाहूल घेते 

किनाऱ्यावर  फिरतांना मग तो 
पाऊलखुणा निर्माण करतो 
वाटते त्याला कि या अथांगतेत 
राहील अस्तित्व त्याचे 
भिडणाऱ्या प्रत्येक लाटेगत मग त्याच्या 
अस्तित्वाचा साचा पुसला जातो ……. 

खरंच  समुद्र खूप महान आहे 
तहान  आपली लहान आहे … 
पण एक विसरू नका 
त्या  अथांगतेला  भेदणारा ,
एक सुर्य तुमच्यातही दडला आहे 
ज्याच्या आगमनाने मग 
हा दर्याही प्रकाशमान होणार आहे …. 
आव्हान करा त्या सूर्याला ………. 
तोच दाखवील तुम्हाला 
तुमच्या जीवनाचा समुद्रकिनारा …. 

                            - वेदांत 






समुद्राच्या किनाऱ्यावर...

समुद्राच्या किनाऱ्यावर  फिरतांना 
वाऱ्याशी मेळ  जुळतो 
फिरता फिरता वाऱ्यागत  मग 
स्वतःवरचा ताबा सुटतो ……… 

भिरभिरणाऱ्या पक्षांगत  मग जाते ते उंच नभी 
आकाशाच्या सिमांनाही मग 
त्या दर्येचा स्पर्श होतो …… 
स्पर्शातून मग त्या 
अथांगतेला दृष्टी येते 
फेसाळणाऱ्या  लाटेवरती आरूढ होऊन मग ते 
किनाऱ्याची  चाहूल घेते 

किनाऱ्यावर  फिरतांना मग तो 
पाऊलखुणा निर्माण करतो 
वाटते त्याला कि या अथांगतेत 
राहील अस्तित्व त्याचे 
भिडणाऱ्या प्रत्येक लाटेगत मग त्याच्या 
अस्तित्वाचा साचा पुसला जातो ……. 

खरंच  समुद्र खूप महान आहे 
तहान  आपली लहान आहे … 
पण एक विसरू नका 
त्या  अथांगतेला  भेदणारा ,
एक सुर्य तुमच्यातही दडला आहे 
ज्याच्या आगमनाने मग 
हा दर्याही प्रकाशमान होणार आहे …. 
आव्हान करा त्या सूर्याला ………. 
तोच दाखवील तुम्हाला 
तुमच्या जीवनाचा समुद्रकिनारा …. 

                            - वेदांत 






Friday, May 29, 2015

परीक्षाकाळातील एक संध्याकाळ …….



परीक्षेचा काळ होता … 
दिवसभर अभ्यास करून 
शरीराला जडत्व आलेले 
मनाने तर कोमेजलेल्या फुलागत 
केंव्हाच मान  टाकलेली … 
अशा त्या चलबिचल अवस्थ्येत  
अभ्यास तो काय होणार 
चला म्हंटल घेऊ जर विसावा 
आलो सहज गच्चीवर 
पाय ठेवता तिथे… उडाला पक्षांचा थवा 
हवेचा हळुवार स्पर्श ,
मनाला ताजेपणा देणारा … 
अस्ताचलाकडे झुकणारा सूर्य 
रोजच काहीतरी नव कोड उलगडणारा ……
पश्चिमेकडील  ती लालसर कडा …… 
दूरवर कुठूनतरी येणारा मंद घंटांचा नाद …. 
आणि रस्त्यावरची तीच नेहमीची गतिमानता 
मधूनच होणारी पानांची सळसळ 
आणि पक्षांची आपल्या पिलांजवळ 
शिघ्रत्वाने  जाण्याची तळमऴ   ….   
प्रत्येक गोष्ट स्पर्शून जात होती मनाला 
तिच्यातला हळुवारपणा ,नाजूकता आणि निसर्गत्व 
नजरेच्या पडद्याआड आकलत होतो… 
मनातल्या प्रत्येक विचाराला 
एक नवीन दिशा मिळत होती
प्रत्येक डोकावणाऱ्या प्रश्नाला 
त्या निरागसतेत  उत्तरे सापडत होती … 
मधूनच डोकावणारी भूतकाळातील गोड आठवण 
तिथेच रमवत होती …
मग माझ्यातली  संध्याकाळ पुन्हा वर्तमानात आणत होती… 
प्रत्येकाला अशी एक संध्याकाळ हवी असते 
जी  अलगद आपल्याला ताजेपणा देते …. 
विचारांना धार येते,
मनाला नाविन्यता …. 
कोमेजलेल्या फुलांमध्ये 
जीवनामृताची पाझर फुटते …. 
एकटेपणा तर नसतोच तेंव्हा 
लोपलेल्या सूर्यानंतर प्रत्येक तारा  डोकावतो जेंव्हा ……. 
पसरणाऱ्या काळोखात 
प्रकाशाची मशाल घेउन…. 
गुरफटलेल्या मनाला 
सागराची अथांगता देऊन …
मग ते आपोआप ध्येयाकडे आकर्षित होते 
पावले घरात येतात 
आणि पुन्हा आभ्यासाला सुरुवात होते …. 
  

                                      -   वेदांत 






  

Saturday, August 9, 2014

आयुष्य खुप सुंदर आहे : Aayushyaa khup sundar aahe

आयुष्य खुप सुंदर आहे
सोबत कुणी नसल तरीही
एकट्यानेच ते फुलवत रहा ...
वादळात वाहुन गेल
म्हणुन रडत बसु नका
वेगळ अस काही माझ्यात खास नाही ,
म्हणुन उदास होउ नका ...

मृगाकडे कस्तुरी आहे ,
फुलाला गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे ,
माझ्या कडे काय आहे असे म्हणुन रडु नका
अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही आहे

आव्हान करा त्या सूर्याला!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात
एक नवे क्षितीज घेउन
अंधारमय रात्र संपुन , सोनेरी किरणांनी सजुन
मग रोजच वाटेल एक नवी सकाळ
उत्साह धेयाने भरून
म्हणुन .....

आयुष्य खुप सुंदर आहे
सोबत कुणी नसलं तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा....
     
               

Friday, August 8, 2014

कोणीतरी हव ...

कोणीतरी हव असत
कोणीतरी हव असत ..सोबत आयुष्याची वाट चढायला
जो हात देयील कधिही साथ न सोडायाला

कोणीतरी हव असत .. जीवाला जिव देणार ...
स्वत:च्या ह्रुदयात निर्विवाद स्थान देणार ....

कोणीतरी हव असतं दिलखुलास हसणारंं...
काहीही न बोलता बरच समजुन घेणार...

कोणीतरी हव असतं.. सोबत लपंडाव खेळणारं..
पटकन .. सापडली नाही की कावर बावर होणार


कोणीतरी हव असत मनमोकळ  बोलायला ....
अन ..भरून आल की मनसोक्त रडायला

                                  { संकलित }

Saturday, August 2, 2014

मैत्री friendship


मैत्री केली आहेस म्हणुन सांगतो ........


गरज म्हणुन 'नात' जोडु नकोस
सोय म्हणुन सहज अस तोडु नकोस
रक्ताच नाही म्हणुन कवडी मोल ठरवु नकोस
भावनांच मोल जाण.. मोठेपणात हरवु नकोस
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नव नात जुळत असत
जन्मभर पुरेल इतक भरभरुन प्रेम मिळत असत
तुझी ओंजळ पुढे कर, कमिपणा मानु नकोस
व्यवहारातल देणघेण फक्त मध्ये आणु नकोस
मिळेल तितक घेत रहा , जमेल तितक देत रहा
दिल घेतल सरेल तेंव्हा... पुन्हा मागुन घेत रहा .
समाधानात तडजोड असते ...फक्त जरा समजुन घे
'नात' म्हणजे ओझ नाही ,  मनापासुन ऊमजुन घे
विश्वासाचे चार शब्द ...दुसर काही देउ नकोस
जाणिवपुर्वक 'नातं' जप , फक्त मांघार घेउ नकोस

                                                   ~[ संकलित ]


Sunday, July 27, 2014

हरकत नाही

हरकत नाही......

"अक्षर छान आलं य  यात !"
माझी कविता वाचतांना
मान तिरकी करत
ती एव्हढंच म्हणते.......


डोळ्यात तुडुंब भरलेली झोप
कपाळावर पेंगत बसलेले भुरटे केस
निसटुन गेलेली ऐक टुकार जांभाई
आणि नंतर ......
वाचताा वाचता मध्येच
आपसुक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातांतुन
 अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली ,
माझी कवितांची वही ......


हरकत नाही ,हरकत नाही,
कविता म्हणजे तरी आणखी काय असते !
 
                         {संकलित}