शाळेचे ते दिवस …………।
शाळेचा तो पहिला दिवस
न विसरला कधी
डोळ्यात येत होती आसव घरी जाण्यासाठी ……
काही काळ झाला …।
शाळेची माया कळू लागली
आईसारखी काळजी घेणारी
शाळाच वाटू लागली
शाळेच्या सानिध्यात वाढताना
मिळाला आनंदाचा ठेवा
शाळेतील अमोल शिक्व्नींनी
केला आमच्या आयुष्याचा मेवा
अाचाय्रांच्या मार्गदर्शनात
घडत आलो आम्ही
आमच्यातील कला गुणांना
वाव दिला तो केवळ शाळेने
आज आमचा शेवटचा दिवस
मन खूप भरून आलंय …
डोळ्यातून बाहेर पडण्यापूर्वीच
शब्दांमधून पाझरु लागलंय
शाळेतील आठवणींनी
तळमळतो प्राण माझा
हळहळते कविता माझ्यातली
शाळेपासून दूर जाताना
शाळेच्या शेवटच्या दिवशीही
दिलासा वाटतो एका गोष्टीचा
मिळतो एक आत्मविश्वास
स्वताच्या पायावर उभा राहण्याचा
म्हणूनच सांगतो मित्रांनो
विसरू नका शाळेला
शाकेविना अर्थ नाही
तुमच्या या जगण्याला