Sunday, December 17, 2017

कुणीतरी हवं ...

२०१७ संपत आलाय आणि आठवणींच्या गुलदस्त्यातल्या मला ... हरवलेलं  कुणीतरी शोधायचंय ... 
खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात असं कुणीतरी असत आणि ते सतत  मनाच्या गाभाऱ्यात अखंड तेवत राहणाऱ्या दिव्याप्रमाणे तेजोमयी असावा .... म्हणून एक प्रयत्न ... 


आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त सोबत कुणीतरी हवं
जगतांनाचे प्रत्येक क्षण
अलगद वेचणारं  कुणीतरी हवं ...

 आठवणींच्या धुक्यात हरवलेल्या
 मार्गस्थ करणार कुणीतरी हवं ...
 कितीहि विसरू म्हंटलं तरीही
 क्षणोक्षणी डोकावणार कुणीतरी हवं ....

ध्येयाच्या मागे धावतांना
हातात हात धरून धावावं .. असं कुणीतरी हवं. 
मध्येच जरा थांबून,
ध्येयापेक्षा सोबतीचा ध्येय पटवणारं  कुणीतरी हवं  ...

आकाशात झेप घेतल्यावरही
परत येण्यासाठीं कुणीतरी हवं ...
ज्याच्यासाठी आयुष्य वेचण्याची इच्छा व्हाव्ही
असं कुणीतरी हवं ....

मौनात मन ओळखणारं 
तुमचं  स्वतःचा कुणीतरी हवं ...
मग ते निराकार असलं तरी चालेल ...
पण अस्तित्वात नसतांनाही ज्याचा अस्तित्व जाणवावं  असं कुणीतरी हवं ....

                                                                                                -- वे. म. तळणीकर